विजेच्या मागणीत जबर वाढ

By admin | Published: October 17, 2014 12:09 AM2014-10-17T00:09:49+5:302014-10-17T00:09:49+5:30

ऑक्टोबर हीटच्या झळा, कृषी पंपांकडून वाढलेली मागणी यामुळे राज्यातील विजेची मागणी तब्बल 16 हजार 5क्क् ते 17 हजार 5क्क् मेगावॉटवर पोहोचली आहे.

Increasing demand for electricity | विजेच्या मागणीत जबर वाढ

विजेच्या मागणीत जबर वाढ

Next
पुणो : ऑक्टोबर हीटच्या झळा, कृषी पंपांकडून वाढलेली मागणी यामुळे राज्यातील विजेची मागणी तब्बल 16 हजार 5क्क् ते 17 हजार 5क्क् मेगावॉटवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विजेच्या मागणीत तब्बल 4 हजार 6क्क् मेगावॉटने वाढ झाली आहे. 
विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती, खासगी कंपन्या व पॉवर एक्स्चेंजमधून अतिरिक्त वीज खरेदी करण्यात येत असल्याचे अधिका:यांनी सांगितले. 
कोळसा, गॅस टंचाईमुळे राज्यात वीजनिर्मितीचे संकट उभे असताना वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी केलेल्या नियोजनामुळे जास्तीत जास्त वीजपुरवठा करण्यात महावितरणला यश आले आहे. गेल्या पंधरवडय़ात 5 ऑक्टोबरला महावितरणकडे 17 हजार 123 मेगावॉट विजेची मागणी होती. त्या तुलनेत 16 हजार 7क्5 मेगावॉटचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर 14 ऑक्टोबरला 17 हजार 573 मेगावॉटवर विजेची मागणी गेली होती. त्या तुलनेत 17 हजार 2क्क् मेगावॉट वीजपुरवठा करण्यात आला. (प्रतिनिधी)
 
काही भागात भारनियमन
या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत विजेची सरासरी मागणी तब्बल 16 हजार 5क्क् मेगावॉटवर गेली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरअखेर्पयत पावसाळी स्थिती असल्याने विजेची मागणी सरासरी 12 ते 13 हजार मेगावॉटर्पयत होती. यंदा ऑक्टोबर महिन्यात विजेच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या पंधरवडय़ात 16 हजार 5क्क् ते 17 हजार 5क्क् मेगावॉट दरम्यान विजेची मागणी नोंदविण्यात आली. त्या तुलनेत महावितरणकडून 16 हजार 5क्क् ते 17 हजार 5क्क् मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे, तर वीज वितरण हानी असलेल्या भागात 3क्क् ते 4क्क् मेगावॉटचे भारनियमन करण्यात येत आहे. 
 
महानिर्मिती व खासगी कंपन्यांची औष्णिक, 
गॅस, कोयना धरण प्रकल्प व केंद्रीय कोटय़ातील विजेसह पॉवर एक्स्चेंजमधून सुमारे 15क्क् मेगावॉट वीज खरेदी करून विजेची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. 

 

Web Title: Increasing demand for electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.