उन्हाची तीव्रता वाढल्याने आठवडेबाजारावर परिणाम
By admin | Published: April 1, 2017 01:44 AM2017-04-01T01:44:33+5:302017-04-01T01:44:33+5:30
महिनाभरापासून वातावरणात उन्हाची तीव्रता वाढल्याने शिर्सुफळच्या आठवडेबाजारावर त्याचा परिणाम दिसून
तळेगाव दाभाडे : महिनाभरापासून वातावरणात उन्हाची तीव्रता वाढल्याने शिर्सुफळच्या आठवडेबाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. भाजीपाल्याची आवक मंदावली असून, फळांच्या व शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली आहे.
मावळ तालुक्यातील मध्यवर्ती असलेले हे गाव आहे आजूबाजूच्या गावांतील भागातील विक्रेते व खरेदीदार तळेगाव येथे आठवडेबाजारात येत असतात. आठवडेबाजारात उन्हाच्या तीव्रतेने भाजीपाल्यांची आवक मंदावली आहे. परिणामी, दरामध्ये वाढ झाली आहे. तसेच, उन्हाचा चटका लागत असल्याने ग्राहकांनी उशिरा बाजारात येणे पसंत केले आहे. याचा परिणाम आठवडेबाजारावर दिसून आला.
उन्हामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. याचा परिणाम आमच्या धंद्यावर झाला असल्याचे अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले. तसेच फळविक्रेत्यांनीसुद्धा फळांना मागणीच्या दृष्टीने दर मिळत नसल्याचे सांगितले.
तळेगाव परिसरात उन्हाच्या तीव्रतेने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला हैराण झाल्या आहेत. उन्हाचा आरोग्यावर परिणाम जाणवू लागल्याचे चित्र आहे. दुपारपर्यंत उष्णतेचे वातावरण असल्याने शेतातील कामावर याचा परिणाम दिसून येत आहे. दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम झाला आहे. (वार्ताहर)