लॉकडाऊननंतर प्रवासासाठी 'एसटी'च फेव्हरेट ; दररोज १२ ते १५ हजार प्रवाशांची ये-जा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 12:14 PM2020-08-28T12:14:56+5:302020-08-28T12:16:45+5:30

एसटीकडे वाढतोय प्रवाशांचा ओढा जिल्ह्यात १२ ते १५ हजार प्रवाशांची ये-जा

Increasing passenger flow to ST 12 to 15 thousand commuters come and go in the district | लॉकडाऊननंतर प्रवासासाठी 'एसटी'च फेव्हरेट ; दररोज १२ ते १५ हजार प्रवाशांची ये-जा

लॉकडाऊननंतर प्रवासासाठी 'एसटी'च फेव्हरेट ; दररोज १२ ते १५ हजार प्रवाशांची ये-जा

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात २०९ बसमार्फत ८८१ फेऱ्या झाल्या असून सुमारे १६ हजार प्रवाशांनी एसटीला पसंती

पुणे : राज्यात पाच महिन्यानंतर सुरू झालेल्या आंतरजिल्हा एसटी बस वाहतुकीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या दररोज १२ ते १५ हजार प्रवाशांची ये-जा होत आहे. त्यामुळे टप्प्याटप्याने बसफेऱ्या वाढविल्या जात आहेत. बुधवारी (दि. २६) जिल्ह्यात २०९ बसमार्फत ८८१ फेऱ्या झाल्या असून सुमारे १६ हजार प्रवाशांनी एसटीला पसंती दिली.

कोरोना संकटामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन केल्यानंतर एसटी बससेवा बंद होती. मागील महिन्यात जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली. तर दि. २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा बससेवेला हिरवा कंदील मिळाला. बससेवा बंद असल्याने अनेक जण विविध शहरांमध्ये अडकून पडले होते. खासगी वाहनाने प्रवास करण्यास अनेक बंधने असल्याने गावी जाता येत नव्हते. बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एसटी बसने प्रवास केल्यास ई-पास किंवा चाचणीचीही आवश्यकता नाही. त्यामुळे आता बसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. पहिल्या दिवशी केवळ १६४ फेऱ्या झाल्या होत्या. हा आकडा सध्या जवळपास हजार फेऱ्यांपर्यंत जात आहे.

दादर, ठाणे, बोरीवलीसह औरंगाबाद, नागपुर, नाशिक, कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर, कोकण या भागात बससेवा सुरू आहे. जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांत दि. २५ ऑगस्ट रोजी २२५ बसमार्फत सुमारे ९५० फेºया झाल्या. त्याद्वारे सुमारे साडे बारा हजार प्रवाशांनी ये-जा केली. दि. २६ ऑगस्ट रोजी २०९ बसच्या ८८१ फेऱ्या झाल्या असून त्यातून सुमारे १६ हजार प्रवाशंनी ये-जा केली. सध्या सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये उपस्थितीवर मर्यादा आहेत. नागरिकही अत्यावश्यक कामांसाठीच प्रवास करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
------------------
दादर, ठाण्याच्या निम्म्याच फेऱ्या
पुण्यातून दादर, ठाणे व बोरीवलीला जाणाऱ्या शिवनेरी व अन्य गाड्यांना प्रवाशांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे सध्या निम्म्याच फेऱ्या होत आहेत. बस सुटण्याच्या वेळा दर तासाला निश्चित केल्या असल्या तरी किमान १५ प्रवासी मिळाल्याशिवाय बस सोडली जात नाहीत. तसेच या गाड्यांमध्ये सध्या वाहकही देण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकृत थांब्याव्यतिरिक्त प्रवासी हात दाखवतील तिथे बस थांबत आहे. स्वारगेट येथून ठाणे व दादरसाठी सध्या सुमारे दहा फेऱ्या होत आहेत. तर बोरीवलीसाठी सुमारे १५ फेºया होत आहेत.
------------------
एसटीकडून घेतली जाणारी दक्षता
- प्रत्येक फेरीनंतर बसची स्वच्छता
- प्रवाशाला मास्क बंधनकारक
- एका आसनावर एकच प्रवासी
- जास्तीत जास्त २२ प्रवाशांना प्रवेश
- लहान मुले, ज्येष्ठांना प्रवेश नाही

Web Title: Increasing passenger flow to ST 12 to 15 thousand commuters come and go in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.