आढाव यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा
By admin | Published: October 7, 2016 02:54 AM2016-10-07T02:54:40+5:302016-10-07T02:54:40+5:30
शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना
पुणे : शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांबरोबरच श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन यांच्या वतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, या मागण्यांसाठी डॉ. आढाव यांनी २ आॅक्टोबरपासून गुलटेकडी, मार्केट यार्ड कार्यालय येथे उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी उपोषणस्थळी डॉ. आढाव यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत म. वि. अकोलकर, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, अशोक राठी, प्रमोद राणी आदी उपस्थित होते. उपोषणाला पाठिंबा म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आपण स्वत: शुक्रवारी दुपारी उपोषणात सहभागी होणार आहे, असे खासदार चव्हाण यांनी डॉ. आढाव यांनी सांगितले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनीही डॉ. आढाव यांची भेट घेतली व उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. राज्य सरकारने शेतीमाल विक्रीसाठी संघटित व्यवस्था तयार करावी, शेतीमाला हमीभाव देण्यासाठी हमीफंड तयार करावा, अशा मागण्या पक्षाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. अजित दरेकर, विलास वाडेकर, राजूशेठ डांगी, रमेश अय्यर, नीलेश बोराटे, द. स. पोळेकर, अनिल आवटी आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
मनसेच्या राज्य परिवहन कामगार सेनेच्या वतीने जयराज लांडगे यांनीही डॉ. आढाव यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या समवेत गणेश खाडे, सनी जगताप, सागर भिसे, गणेश पासलकर, अमर नाईक, कुशल शिंदे, सचिन नागरे, नागेश मलठणकर, सागर राठोड आदी त्यांच्यासमवेत होते.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली भेट : मागण्यांना पाठिंबा
४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.
४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आढाव यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असून, त्यांचा संदेश घेऊन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे व इतर प्रमुख काँग्रेस नेत्यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली.
४ या नेत्यांनी बाबा आढाव यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले.
४या शिष्टमंडळात आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, नगरसेवक अभय छाजेड, संजय बालगुडे, आबा बागुल यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.