अवकाळीचा फेरा सुरूच! राक्षेवाडीत गारपीट
By admin | Published: April 11, 2015 05:14 AM2015-04-11T05:14:11+5:302015-04-11T05:14:11+5:30
राक्षेवाडी-भांबुरवाडी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने उन्हाळी बाजरी, कैऱ्या व तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दावडी : राक्षेवाडी-भांबुरवाडी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने उन्हाळी बाजरी, कैऱ्या व तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तासभर गारांसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतात पाणीच पाणी केले. वाऱ्यामुळे उन्हाळी बाजरी पीक भुईसपाट झाले. झाडांवरील कैऱ्या खाली पडल्या. तसेच कोथिंबीर पीक गारांच्या माऱ्यामुळे शेतात आडवे झाले. पूर्व भागातील वाफगाव, गुळाणी, वाकळवाडी, वरूडे, कनेरसर या परिसरात शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. बहुतेक
कांदा झाकण्यासाठी...
आळेफाटा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यांसह विजेचा कडकडाट झाला. पावसाने तुरळक हजेरी लावली; मात्र यामुळे शेतकरीवर्गाची धांदल उडाली. आळेफाटा उपनगरात विक्रीस आलेला कांदा झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली.
शेतकऱ्यांची धांदल
खळद : पुरंदर तालुक्यातील खळद, शिवरी, तक्रारवाडी, वाळुंज, निळुंजसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रस्ते, शिवारे जलमय झाली होती. शेतकऱ्यांची धांदल झाली. कांद्याची काढणी सुरू असून, तो भिजल्याने नुकसान झाले. फळबागांनाही त्याचा फटका बसला. यापूर्वी झालेल्या पावसाने आंब्याचा मोहर गळाला होतो. आता फळ धरत असताना हा वादळी पाऊस झाल्यान ती गळून पडली आहेत. डाळिंबपिकाला फटका बसला असल्याचे उत्पादक चंद्रकांत कामथे यांनी सांगितले.