इंदापूर : २२ गावांचा पाणीप्रश्न कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:26 AM2018-05-11T02:26:58+5:302018-05-11T02:26:58+5:30

माण-खटाव तालुक्याची दुष्काळग्रस्त ओळख पुसण्याचा प्रयत्न श्रमदानातून होत आहे. त्याकामी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केवळ एका तासात दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळवून दिला.

Indapur: 22 villages always have water questions | इंदापूर : २२ गावांचा पाणीप्रश्न कायमच

इंदापूर : २२ गावांचा पाणीप्रश्न कायमच

googlenewsNext

लाखेवाडी - माण-खटाव तालुक्याची दुष्काळग्रस्त ओळख पुसण्याचा प्रयत्न श्रमदानातून होत आहे. त्याकामी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केवळ एका तासात दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळवून दिला. ही बाब लक्षात घेता, इंदापुरातील २२ गावच्या बारमाही प्रश्नाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आश्वासन दिले होते. परंतु, आज तब्बल २५ ते ३० वर्षे उलटल्यानंतर देखील या २२ गावातील पाणीप्रश्नाची अंमलबजावणी सणसर कटद्वारे झालेली नाही. त्यामुळे ‘पवार साहेब’ तुम्ही इंदापुरातील २२ गावांतही एकदा लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
माण (सातारा) दौºयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असताना त्यांनी वेळेत वेळ काढून वॉटर कप स्पर्धेच्या निमित्त तेथील दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्या. शिवाय तेथील जलसंधारणाच्या कामासाठी पवार यांनी केवळ एका तासांमध्ये पाच कोटींचा निधी मिळवून दिला. जलसंधारणाच्या कामासाठी सरकारवर अवलंबून न राहता मदत करण्याची ग्वाही सुद्धा पवार यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी इंदापुरातील दुष्काळी गावांची पाहणी करावी, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.
लाखेवाडी, रेडा, रेडणी, काटी, वरकुटे, निमगाव केतकी, निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी, घोरपडवाडी, गोतोंडी, खोरोची, चाकाटी, शिरसटवाडी, हगारवाडी, शेळगाव या गावांसह अन्य दक्षिण पट्ट्यातील गावांची दुष्काळी म्हणून ओळख कायम आहे. इंदापुरातील २२ गाव आजही पाण्यासाठी तहानलेली आहेत. विशेष म्हणजे याच बावीस गावच्या पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी ही गावे पाणीदार करण्याचे, आश्वासन दिले होते. परंतु, आज तब्बल २५ वर्ष झाली तरी या २२ गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे शासन सत्तेवर आल्यानंतरही याच मुद्याचे राजकारण केले गेले. पाणी प्रश्न सुटलाच नाही, पुन्हा सत्तेवर आल्यानंतर या गावांचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले गेले. सर्वच राजकीय पक्षांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.
इंदापुरातील या गावांना मुळच्या ‘जीआर’ प्रमाणे सणसर कटव्दारे ३.९ टीएमसी पाणी दरवर्षी मिळायला हवे. परंतु, पाणीच मिळत नसल्याने २२ गावांच्या हक्काचे पाणी कोठे जाते? याचे कोडे आजपर्यंत या गावातील ग्रामस्थांना उलगडलेले नाही. याच पाणी प्रश्नावर शेतकºयाला आत्महत्या करावी लागली. ज्येष्ठ नेते शरद पवार साताºयातील माण, खटाव तालुक्यात तासाभरात पाच कोंटींचा निधी देतात. तर काही संस्थांकडून देखील निधी उभारला. तसेच इंदापूर तालुक्यातील २२ गावांना भेट देवून पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी या भागातील शेतकरी करीत आहेत.

केवळ टँकरने पाणी नको....
- इंदापुरातील या २२ गावांतून एप्रिल, मे महिन्यांत टँकरची मागणी ठरलेली असते. यानुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही केला जातो. परंतु, केवळ टँकरचे पाणी देवून तहान भागवण्यापेक्षा पाण्याकरिता ठोस उपाय योजना करावी. शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली लावावा, अशी मागणी तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील गावांतून होऊ लागली आहे.

Web Title: Indapur: 22 villages always have water questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.