APMC Election Result: इंदापूरला शेतकरी विकास पॅनलने स्वाभिमानीचा उडविला धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 06:04 PM2023-04-29T18:04:51+5:302023-04-29T18:05:20+5:30

निकालानंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक

Indapur APMC | Indapur's Farmer Development Panel has blown the pride away | APMC Election Result: इंदापूरला शेतकरी विकास पॅनलने स्वाभिमानीचा उडविला धुव्वा

APMC Election Result: इंदापूरला शेतकरी विकास पॅनलने स्वाभिमानीचा उडविला धुव्वा

googlenewsNext

इंदापूर (पुणे) :इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील 'शेतकरी विकास पॅनल'ने शिवसेनेच्या महारुद्र पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी पॅनलचा धुव्वा उडवत सर्व १४ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळविला. दरम्यान, निकालानंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेच्या सभागृहात सकाळी उशिरा मतमोजणीस सुरुवात झाली. मतपत्रिका एकत्र केल्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल येण्यास सुरुवात झाली. यावेळी दोन्ही पॅनलचे प्रमुख व उमेदवार तेथे उपस्थित होते. पहिल्या फेरीतच कल स्पष्ट झाला. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी पॅनलच्या प्रमुखांनी व उमेदवारांनी मतमोजणीच्या ठिकाणाहून काढता पाय घेण्यास सुरुवात केली. चार वाजण्याच्या सुमारास मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर झाला. त्यानंतर आ. दत्तात्रय भरणे, आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह सर्व विजयी उमेदवारी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाकडे गेले. तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक, माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर विजयी सभा घेण्यात आली.

प्रचाराला वेळ कमी मिळाला व विरोधकांकडून अपप्रचार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, दिवसरात्र एक करत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत, तर कधी सोशल मीडियाचा वापर करत आप्पासाहेब जगदाळे यांनी हा विजय साकारला. त्यांना विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची भक्कम साथ मिळाली. या निवडणुकीपासून दूर असल्याचा दिखावा करत असलेल्या भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रचाराच्या शेवटच्या तीन दिवसांत आप्पासाहेब जगदाळे यांना गाळून मतदान करण्याचे आवाहन केल्याची चर्चा होती. विजयी सभेत बोलताना जगदाळे यांनी या चर्चेला एक प्रकारे दुजोरा दिल्याने पुढील काळात राजकीय धुमश्चक्री सुरू राहील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्टचे मुकुंद शहा व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी दिलेले योगदान आप्पासाहेब जगदाळे विजय देऊन गेले.

विजयी उमेदवार कंसात मिळालेली मते

कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदारसंघ

आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे ( २२३७), विलास सर्जेराव माने ( २२४४), दत्तात्रय सखाराम फडतरे (२२७१), संग्रामसिंह दत्तात्रय निंबाळकर (२२८७), रोहित वसंत मोहोळकर(२२७५), मनोहर महिपती ढुके(२०३८), संदीप चित्तरंजन पाटील (२२२७).

महिला प्रतिनिधी : रूपाली संतोष वाबळे (२१५२), मंगल गणेशकुमार झगडे (२१२६)

कृषी पतसंस्था विजाभज : आबा गणपत देवकाते (२२५६),

इतर मागास वर्ग : तुषार देवराज जाधव (२३७६).

ग्रामपंचायत

सर्वसाधारण : मधुकर विठोबा भरणे(८६६), संतोष नामदेव गायकवाड (७६७).

अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : अनिल बबन बागल (७८९).

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

ग्रामपंचायत अजाज - आ. यशवंत विठ्ठल माने.

आडते-व्यापारी - दशरथ नंदू पोळ (बिनविरोध), रौनक किरण बोरा.

हमाल-मापारी - सुभाष ज्ञानदेव दिवसे.

Web Title: Indapur APMC | Indapur's Farmer Development Panel has blown the pride away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.