इंदापूरला स्रेहसंमेलनात विद्यार्थ्यांमध्ये मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:03 AM2018-01-05T02:03:16+5:302018-01-05T02:03:27+5:30
माध्यमिक विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी किरकोळ बाचाबाचीतून एका डोळ्याने अंध असणाºया युवकाच्या दुस-या डोळ्यावर लोखंडी फायटरने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत करण्याचा प्रकार शेटफळ हवेली येथे रविवारी (दि. ३१) घडला.
इंदापूर - माध्यमिक विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी किरकोळ बाचाबाचीतून एका डोळ्याने अंध असणाºया युवकाच्या दुस-या डोळ्यावर लोखंडी फायटरने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत करण्याचा प्रकार शेटफळ हवेली येथे रविवारी (दि. ३१) घडला.
या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पहिली तक्रार स्वप्निल बाळासाहेब करगळ (वय २२ वर्षे, रा.शेटफळ हवेली, ता. इंदापूर) याने केली आहे. त्या तक्रारीवरुन सुनील भरत नरबट, संदीप चव्हाण, संतोष दशरथ नरबट, विजय नरबट (सर्व रा.शेटफळ हवेली, ता. इंदापूर) व नाव पत्ता माहित नसलेल्या इतर पाच ते सहा अनोळखी लोकांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी तक्रार भरत तायाप्पा नरबट (रा.शेटफळ हवेली,ता. इंदापूर) यांनी दिली आहे.त्यांच्या तक्रारीवरुन बाळासाहेब जिजाबा करगळ, पांडुरंग जिजाबा करगळ, हिरालाल पांडुरंग करगळ, नानासाहेब पांडुरंग करगळ, राजेंद्र रामचंद्र पांढरे (सर्व रा.शेटफळ हवेली, ता.इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी सांगितले की, शेटफळ हवेली येथे बाळासाहेब करगळ यांच्या अधिपत्याखाली चालणा-या भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालयात रविवारी रात्री वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरु होता. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुलींच्या कपडे बदलण्याच्या खोलीजवळ उभा राहिलेला शाळेचा शिपाई सुरजित अशोक चव्हाण यास सुनील भरत नरबट, संदीप चव्हाण, संतोष दशरथ नरबट,विजय नरबट व इतर पाच ते सहा अनोळखी इसम शिवीगाळ दमदाटी करत होते. त्यांना स्वप्निल करगळ याने हटकले. त्यामुळे राग येवून सुनीलने स्वप्निलच्या उजव्या डोळ्यावर लोखंडी फायटरने मारले. इतरांनी स्वप्निल व शिपाई चव्हाण यांस लाथाबुक्यांनी मारहाण केली. स्वप्निलच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट सीमकार्डसह फोन हिसकावून, स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उधळून आरोपी पळून गेले असे फिर्यादित म्हटले आहे. तर दि.१ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता बाळासाहेब जिजाबा करगळ,पांडुरंग जिजाबा करगळ, हिरालाल पांडुरंग करगळ, नानासाहेब पांडुरंग करगळ, राजेंद्र रामचंद्र पांढरे हे आरोपी आपल्या घरी आले. तुझ्या मुलाने शाळेवर भांडण केली आहेत. त्याला आम्ही जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देवून ते गेले. आपला मुलगा सुनील नरबट हा रविवारी रात्री साडेअकरा वाजलेपासून घरी आला नाही. त्यामुळे वरील आरोपींनी त्याचा खून करण्याच्या हेतूने त्याला पळवून नेले आहे, अशी तक्रार भरत नरबट यांनी दिली. त्यावरुन बाळासाहेब करगळ व इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.