इंदापूर जिल्हा परिषद शाळा इमारत जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:28 AM2018-08-26T00:28:59+5:302018-08-26T00:29:15+5:30
इंदापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ ची इमारत अतिशय जीर्ण होऊन मोडकळीस आली आहे. इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून शाळेच्या वºहांड्यात एकही फरशी व्यवस्थित राहिली नाही.
इंदापूर : इंदापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ ची इमारत अतिशय जीर्ण होऊन मोडकळीस आली आहे.
इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून शाळेच्या वºहांड्यात एकही फरशी व्यवस्थित राहिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून
नवीन इमारत बांधण्यात यावी यासाठी मनसेच्या वतीने राजेंद्र हजारे व कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे केले. मात्र
निष्क्रिय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार दि. २४ रोजी तहसिलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हंटले आहे की, इंदापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ व २ ची इमारत जुनी (जिर्ण) झाली असून, अनेक दिवसांपासून सदर प्रकरणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पाठपुरावा व उपोषण, आंदोलन करुन सुध्दा काहीच हालचाली करण्यात आल्या नाहीत. यावेळी इंदापूर तालुका मनसेच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे की, शाळेतील मुलांच्या जिवीतास धोका झाल्यास त्यास संबंधीत अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. याची त्वरित दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात दि. २९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. ४आम्ही दि. ५ जुलै रोजी शिक्षण अधिकारी व मुख्याधिकारी यांना पत्र दिले होते की, सदरची इमारत धोकादायक आहे असे पत्र देवून सुद्धा, अधिकारी हे एकमेकांच्या विरोधात टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत.
४मुले अद्यापही त्याच धोकादायक इमारतीमध्ये बसविली जात आहेत. त्या इमारती पासुन मुलांच्या जीविताला घोका होण्याची शक्यता आहे. असे पत्र शिक्षण अधिकारी यांनी दि. ५ जानेवारी रोजी लेखी दिले तर मुख्याधिकारी यांनी देखील लेखी पत्र दिले आहे.