उजनी पाणी प्रश्न पुन्हा पेटला! धरणाच्या गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 06:28 PM2021-06-10T18:28:29+5:302021-06-10T18:28:39+5:30

मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

Indapur farmers doing agitation at the gate of ujani dam due to water dispute with government | उजनी पाणी प्रश्न पुन्हा पेटला! धरणाच्या गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरु

उजनी पाणी प्रश्न पुन्हा पेटला! धरणाच्या गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Next
ठळक मुद्देबळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक अनिल खोत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पांठीबा देत असल्याचे पत्र आंदोलकांना दिले

बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी पाच टीएमसी पाणी मंजुरीचा आदेश शासनाने रद्द केला आहे. याप्रकरणी पुनर्विचार होऊन शासनाने रद्द केलेला आदेश पूर्ववत करून इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा पाणी प्रश्न तात्काळ निकालात काढण्यात यावा. अशा काही मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शेतकऱ्यांनी उजनी धरण तरटगाव गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.  मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नसल्याचे पार्टीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाच टीएमसी पाणी रद्द आदेशाचा पुनर्विचार व्हावा, उजनीतून मराठवाड्याला देण्यात येणारे २१ टीएमसी पाणी तात्काळ बंद करण्यात यावे, सोलापूरसाठी बेकायदेशीर सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात यावे. सोलापूर जिल्ह्यात धरणग्रस्तांच्या गावगुंडानी बळकावलेल्या जमिनी धरणग्रस्तांना परत करण्यात याव्यात. या मागण्यांसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे.

बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक अनिल खोत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पांठीबा देत असल्याचे पत्र आंदोलकांना यावेळी दिले.

Web Title: Indapur farmers doing agitation at the gate of ujani dam due to water dispute with government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.