इंदापूर नगरपरिषदेचा कोणताही करवाढ नसलेला शंभर कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:12 AM2021-02-25T04:12:18+5:302021-02-25T04:12:18+5:30

इंदापूर नगरपालिकेच्या वतीने ऑनलाईन मीटिंग बुधवार (दि.२४) रोजी घेण्यात आली. यामध्ये नगरपालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाच्या सभेमध्ये ...

Indapur Municipal Council approves Rs 100 crore budget without any tax hike | इंदापूर नगरपरिषदेचा कोणताही करवाढ नसलेला शंभर कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

इंदापूर नगरपरिषदेचा कोणताही करवाढ नसलेला शंभर कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

Next

इंदापूर नगरपालिकेच्या वतीने ऑनलाईन मीटिंग बुधवार (दि.२४) रोजी घेण्यात आली. यामध्ये नगरपालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाच्या सभेमध्ये नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी माहिती दिली. यामध्ये उपनगराध्यक्ष, सर्व विभागाचे सभपती, सर्व नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी श्रीमती निर्मला राशिनकर व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

अर्थसंकल्पात रमाई आवास योजना लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थ्यांना भोगवटा दाखला, स्क्रूटिनी शुल्क मध्ये ५० टक्के सूट देण्यात आलेली आहे. बांधकाम परवानगी स्कॅनिंग फीमध्ये ही कपात करण्यात आलेली असून अत्यल्प दर ठेवण्यात आलेले आहेत.

वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या नूतन स्मारकासाठी तब्बल रुपये १ कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रशाहीर अमर शेख यांचे स्मारकासाठी रुपये २५ लक्ष इतक्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी रुपये २५ लक्ष इतक्या रकमेच तरतूद करण्यात आलेली आहे.

हजरतबुवा चांदशाह विकास आराखड्यासाठी रुपये २५ लक्ष इतक्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे.

पंधरावा वित्त अायोगातील तरतुदी पुढीलप्रमाणे -

१) नगरपरिषदेतील रेकॉर्डचे स्कॅनिंग व डिजिटलायजेशनसाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पंधरावा वित्त आयोग निधी मध्ये ३ कोटी रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. नगरोत्थान योजनेच्या लोकवर्गणीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अल्पसंख्याक अनुदान योजने अंतर्गत १० लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. महाराष्ट्र नगरोत्थान योजनेमधून भुयारी गटर योजनेसाठी प्राथमिक अवस्थेत १५ कोटी रुपये अंदाजपत्रकात अपेक्षित धरलेली आहे. रस्ता अनुदानमधून, सन २०२१-२२ मध्ये रस्ता अनुदान योजनेतून ३ कोटी रुपये रकमेचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. त्यातून नियोजित कामे करण्याचे प्रयोजन आहे.

सुजल निर्मल अभियान सन २०२१-२२ मध्ये ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार (नागरी दलितवस्ती योजना) योजने अंतर्गत प्रस्तावित कामासाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच रमाई आवास योजने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत २ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे.

त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण याेजनेअंतर्गत क्रीडांगण व इतर कामासाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. नागरी दलितोत्तर योजनेअंतर्गत सन २०२१-२२ साठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

स्थानिक विकास निधी (आमदार व खासदार) योजने अंतर्गत २ कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. अग्निशमन योजने अंतर्गत १० लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान योजने अंतर्गत ७.५० कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आलेला आहे.

Web Title: Indapur Municipal Council approves Rs 100 crore budget without any tax hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.