इंदापूर नगरपरिषदेत विषय समिती सभापती निवडीत काँग्रेसला तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन पदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:17 AM2021-02-17T04:17:02+5:302021-02-17T04:17:02+5:30
इंदापूर नगरपरिषदेवर आजही काँग्रेस पार्टीची सत्ता असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधी पक्ष म्हणून काम पहात आहे. यंदाच्या वर्षेअखेरीस इंदापूर ...
इंदापूर नगरपरिषदेवर आजही काँग्रेस पार्टीची सत्ता असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधी पक्ष म्हणून काम पहात आहे. यंदाच्या वर्षेअखेरीस इंदापूर नगरपालिकेची निवडणूक लागणार असून, आज झालेल्या सभापती निवडीमुळे शहरातील राजकीय वर्तुळात नवसंजीवनी आली.
झालेल्या या सभेमध्ये विविध समित्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. बांधकाम नियोजन व विकास समिती सभापती धनंजय विश्वासराव पाटील (कॉंग्रेस), पाणीपुरवठा व अर्थ समिती सभापती अनिता रमेश धोत्रे (काँग्रेस), स्वच्छता शेती व उद्यान समिती सभापती अनिकेत अरविंद वाघ (राष्ट्रवादी), वीज व वृक्षसंवर्धन समिती सभापती सुवर्णा नितीन मखरे (काँग्रेस), महिला विकास व बालकल्याण समिती सभापती हेमलता वसंतराव माळुंजकर (राष्ट्रवादी), उपसभापती मीना ताहेर मोमीन यांची निवड झाली आहे.
. यामध्ये पीठासीन अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी कामकाज पाहिले व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांच्या उपस्थितीमध्ये ही विशेष सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या समित्यांचे गठन करण्यात येऊन निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन इंदापूर नगरपरिषदेच्या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर व इंदापूर नगरीचे नगराध्यक्षा माननीय अंकिता मुकुंद शहा व उपस्थित मान्यवरांनी केले. या वेळी सभेचे सर्व कामकाज कार्यालयीन अधीक्षक गजानन पुंडे यांनी केले.