इंदापूर नगरपालिका देशात थ्री स्टार सिटी ८० कोटींच्या विकासामुळे झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:12 AM2021-02-13T04:12:33+5:302021-02-13T04:12:33+5:30
नगराध्यक्षा शहा म्हणाल्या की, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला ...
नगराध्यक्षा शहा म्हणाल्या की, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे. त्यातून अनेक विकासकामे झालेली आहेत. नगरोत्थान, दलितोत्तर वस्ती योजना रस्ता अनुदान, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १२ कोटी २५ लाख, सुसज्ज प्रशासकीय नूतन इमारत ५ कोटी, १०२ गाळ्यांचे नूतन शॉपिंग सेंटर ६ कोटी १० लाख, इंदापूर शहराकरिता सुधारित नवीन पाणीपुरवठा योजना ३५ कोटी आदी ८० कोटी रुपयांपेक्षा अधिकची कामे पूर्णत्वास आली आहेत.
नगरपरिषदेने लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ उभी करून स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत २०१८, २०१९, २०२० असे सलग तीन वर्षे उत्कृष्ट कार्य केल्याने राष्ट्रीय पातळीवरील अनेक पारितोषिकांनी नगरपालिकेला सन्मानित करण्यात आले असून, २० कोटी रुपयांचे बक्षीसही नगरपालिकेस जाहीर झालेले आहे.
_______________________________________
चौकट
--
ग्रीन सिटीसाठी विशेष प्रयत्न
इंदापूर शहराची ग्रीन सिटीकडे वाटचाल
इंदापूर शहरात विविध ठिकाणी व नागरिकांना हवे त्या ठिकाणी शहा नर्सरी व इंदापूर नगरपरिषद, नगरसेवक, सामजिक कार्यकर्ते, खाजगी संस्था, नागरिक यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने शहराच्या वैभवात तर भर पडलीच आहे, त्याचबरोबर लावलेल्या झाडांची चांगली जोपासना व काळजी नगरपरिषदेचे कर्मचारी घेत आहेत. त्याचबरोबर लावलेल्या झाडांची निगा चांगली राखली जात आहे का, यासाठीही विशेष लक्ष दिले जात असल्याचे नगराध्यक्षा शहा यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक :
फोटो ओळी : नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा