इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोकणात मदत रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:11 AM2021-07-27T04:11:35+5:302021-07-27T04:11:35+5:30

यावेळी वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, ...

Indapur NCP sends aid to Konkan | इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोकणात मदत रवाना

इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोकणात मदत रवाना

Next

यावेळी वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष सचिन बोगवत, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सचिन सपकळ, गणेश थोरात श्रीराज भरणे, अनिकेत भरणे, अक्षय भरणे आदी उपस्थित होते.

एक हजार पाचशे साड्या, दोन हजार ब्लँकेट, एक हजार पाचशे टॉवेल, लहान मोठ्या मुली आणि मुलांसाठी प्रत्येकी पाचशे कपडे, पाण्याचे एक हजार बॉक्स, पाचशे बिस्किटांचे बॉक्स, इतर खाद्यपदार्थांचे ऐंशी बॉक्स, गहू आठशे किलो, तांदूळ एक हजार किलो, साखर आणि मसाला प्रत्येकी तीनशे किलो मदत रवाना करण्यात आली.

यावेळी निर्मलाताई पानसरे म्हणाल्या की, सध्यस्थितीत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशावेळी तेथील लोकांना मदतीची गरज आहे.

कोकणात पूरग्रस्तांना मदत पाठविताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते व मान्यवर

Web Title: Indapur NCP sends aid to Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.