इंदापूर पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर; अनेक मातब्बरांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 01:09 PM2022-07-28T13:09:17+5:302022-07-28T13:21:55+5:30

अनेक मातब्बरांना धक्का...

Indapur Panchayat Samiti Announces Leaving Reservation; A shock to many elders | इंदापूर पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर; अनेक मातब्बरांना धक्का

इंदापूर पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर; अनेक मातब्बरांना धक्का

googlenewsNext

कळस (पुणे):इंदापूरपंचायत समितीच्या १८ गणांसाठी आरक्षण आज जाहीर करण्यात आले. इंदापूरपंचायत समितीच्या शंकरराव पाटील सभागृह  इंदापूर येथे सकाळी ११.३० वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे. 

इंदापूर तालुका पंचायत समितीवर भाजप समर्थक सत्ता आहे. मात्र माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत काही नेतेमंडळी मतदारसंघात अपेक्षित आरक्षण मिळाल्याने समाधान व्यक्त करत आहेत तर अनेक विद्यमान आपला मतदारसंघ आरक्षित झाल्याने अडचणीत आले आहेत.

इंदापूर पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत-

अनुसूचित जाती मतदारसंघ राखीव गण (३)- वालचंदनगर व बावडा ( अनुसूचित जाती महिला) लुमेवाडी (अनुसूचित जाती पुरुष)

ओबीसीसाठी- सणसर, काटी, माळवाडी (महिला राखीव), बिजवडी (महिला राखीव)

सर्वसाधारण महिला- शेटफळगढे, बोरी, भिगवण, वडापुरी, वरकुटे खुर्द

सर्वसाधारण- पळसदेव, निमगांव-केतकी, शेळगांव, अंथुर्णे, बेलवाडी, लासुर्णे, काटी

नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर येथील म्हत्रे प्रतिक या विद्यार्थ्यांच्या हातून सोडत काढण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार श्रीकांत पाटील गटविकास अधिकारी विजयकुमार परीट उपस्थित होते.

Web Title: Indapur Panchayat Samiti Announces Leaving Reservation; A shock to many elders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.