इंदापूर पोलिसांनी चोरीच्या २० दुचाकींसह ९ आरोपी केले जेरबंद; तीन अल्पवयीनांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 01:56 PM2021-08-17T13:56:40+5:302021-08-17T13:57:01+5:30
इंदापूर पोलिसांनी चोरीच्या २० दुचाकींसह ९ आरोपी केले जेरबंद; नऊ जणांच्या टोळीत तीन अल्पवयीनांचा समावेश
बाभुळगाव : निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथील व्याहळी रोडवर रात्रीच्या वेळी शस्रांच्या धाकाने लुटमार व दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा दरोडेखोर टोळी पकडुन त्यांच्याकडुन चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत करण्यात इंदापूर पोलीस पथकाला काही दिवसांपूर्वी यश आले. यामध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे.तर पंढरपुर पोलीसांनी तीन दुचाकी चोरांची टोळी पकडुन त्यांचे ताब्यातील पुणे जिल्ह्यात चोरी केलेल्या १४ दुचाकी जप्त करत आरोपी व मुद्देमाल इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याने एकूण २० दुचाकीसह ९ आरोपींना पकडण्यात इंदापूर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.
यामध्ये निमगाव केतकी येथे पकडलेल्या सहा जणांमध्ये राजू मोहन चव्हाण (वय २३, रा.सिन्नरफाटा, अश्विनी काॅलनी,नाशिक), अनिल अंकुश काळे ( वय १८,रा.वेळापूर विजबोर्ड मागे,जि सोलापूर),नितिन पोपट लोंढे.रा.खुडुस,जि.सोलापूर) अशी ६ जणांच्या टोळीतील तीन आरोपींची नावे असून तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत.तर महेश कांतीलाल नवले (रा. माढा, जि.सोलापूर), सिद्धार्थ मुसळे (रा.माढा,जि.सोलापूर) व सदाशिव फडतरे (रा.पंढरपुर) अशी पंढरपुर पोलिसांनी अटक केलेल्या तीन जणांच्या टोळीतील अटक आरोपींची नावे आहेत.
इंदापूर पोलिसांनी वरील सर्व आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकुण २० मोटार सायकली जप्त करून ९ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर अल्पवयीन तीन आरोपींना पुणे येथील बाल सुधारगृृहात ठेवण्यात आल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई ही इंदापूर पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृृृृृृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने,पोलीस उपनिरीक्षक संजय धोत्रे पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.