इंदापूरला कुत्र्याचा धुमाकूळ; ११ जणांना चावा

By admin | Published: May 11, 2017 04:24 AM2017-05-11T04:24:54+5:302017-05-11T04:24:54+5:30

शहरातील चाळीस फुटी रस्ता ते व्यंकटेशनगर या पट्ट्यात बुधवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घालत केवळ अर्ध्या तासात

Indapur is a scavenger; Bite 11 people | इंदापूरला कुत्र्याचा धुमाकूळ; ११ जणांना चावा

इंदापूरला कुत्र्याचा धुमाकूळ; ११ जणांना चावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : शहरातील चाळीस फुटी रस्ता ते व्यंकटेशनगर या पट्ट्यात बुधवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घालत केवळ अर्ध्या तासात सुमारे अकरा जणांचा चावा घेतला. त्यामध्ये लहानांसह वृद्ध महिलांचा समावेश होता.
त्याच्या या हल्ल्याने सैरभैर झालेल्या युवकांनी पिसाळल्याच्या संशयावरून दोन कुत्री मारून टाकली. तरीही कुत्रे चावल्याची तक्रार घेऊन लोक येत होते. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे सात ते आठ कर्मचारी दुपारी उशिरापर्यंत त्या कुत्र्याचा शोध घेत होते.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला सुरू केला. त्याच्या तावडीत जी व्यक्ती सापडेल त्याच्या तोंडात येईल त्या अवयवाचा करकचून चावा घेत हे कुत्रे सगळीकडे सैरावैरा पळत सुटले. इंदापूर महाविद्यालयासमोरच्या चाळीस फुटी रस्त्यापासून ते डॉ. आंबेडकरनगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर, कसबा पेठ, व्यंकटेशनगर असा धुमाकूळ त्याने घातला. त्याच्या चाव्यामुळे जखमी झालेल्यांची रिघ उपजिल्हा शासकीय रुग्णालयात लागली. कार्तिक महेश डोके (वय ५ वर्षे), वालूबाई कोंडिबा वाकळे (वय ९०), शिवम देविदास महाजन, किसाबाई गणपत गाढवे, अयान तोसिर बागवान, इल्शा रमजान बागवान, गणेश हंबीरराव लोंढे, संजय दशरथ घनवट, मिलिंद पवार, अथर्व अशोक पारेख, शिवदत्त बाबूराव वाघमोडे अशी श्वानदंश झालेल्यांची नावे आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ चंदनशिवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची तातडीने तपासणी करून श्वानदंशावरील लसी दिल्या. १०८ रुग्णवाहिकेतून या सर्वांना पुढील उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठवले.

Web Title: Indapur is a scavenger; Bite 11 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.