इंदापूर, सोलापूरकरांना बसणार यंदा दुष्काळी झळा; उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 02:35 PM2023-11-02T14:35:29+5:302023-11-02T14:36:25+5:30

न्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. परिणामी आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना दुष्काळी झळा बसणार आहेत...

Indapur, Solapur residents will face drought this year; 29.48 TMC water storage in Ujani Dam | इंदापूर, सोलापूरकरांना बसणार यंदा दुष्काळी झळा; उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा

इंदापूर, सोलापूरकरांना बसणार यंदा दुष्काळी झळा; उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा

इंदापूर (पुणे) : आजअखेर उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ५५.०२ एवढी आहे. जुलै महिन्यात आषाढी वारीला व सीना माढा बोगद्यातून एकूण ३.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. आगामी काळात देखील पाणी सोडण्यात येणार असल्याने उजनी धरण व पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न गंभीर होणार आहे. उन्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. परिणामी आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना दुष्काळी झळा बसणार आहेत.

आज अखेर उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५५.०२ एवढी आहे. पाण्याचे प्रसार क्षेत्र २७६.२९ चौरस किलोमीटर एवढे नोंदविण्यात आले आहे. पाण्याची पातळी ४९४.५९५ मीटर आहे. एकूण पाणीसाठा ९३.१४ टीएमसी एवढा आहे. गेल्यावर्षी याच तारखेला पाणीसाठा ५९.६२ टीएमसी होता. टक्केवारी १११.२८ एवढी होती. यंदाच्या वर्षी दि.१९ ते २९ ऑगस्ट दरम्यान उजनी धरणातून ३.८० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार -

येत्या २४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी येते आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीला पाणी सोडावे लागणार आहे. जानेवारी महिन्यात माघी यात्रा येत आहे. या दोन्हीही यात्रांसाठी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी येत असतात. त्यामुळे चंद्रभागेला पाणी सोडावेच लागणार आहे. आज रोजी धरणात उपलब्ध असणाऱ्या ५५ टक्के उपयुक्त पाणीसाठ्यातील थोडासा हिस्सा त्यासाठी खर्ची पडणार आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश स्थिती दिसून येत आहे. माढा मोहोळ पंढरपूर व सोलापूर भागातून पाण्याची वाढती मागणी होणारच आहे. त्यासाठी उजनी धरणातील पाणीसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Indapur, Solapur residents will face drought this year; 29.48 TMC water storage in Ujani Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.