इंदापूर तालुक्याचा विकास काँग्रेसमुळे

By admin | Published: October 13, 2014 11:24 PM2014-10-13T23:24:16+5:302014-10-13T23:24:16+5:30

काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. इंदापूर तालुक्याने राज्याला नेतृत्व दिले आहे.

Indapur taluka development Congress | इंदापूर तालुक्याचा विकास काँग्रेसमुळे

इंदापूर तालुक्याचा विकास काँग्रेसमुळे

Next
इंदापूर : काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. इंदापूर तालुक्याने राज्याला नेतृत्व दिले आहे. त्यामुळे या तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करा. केंद्रातील भाजपप्रणीत सरकारमुळे सामान्य जनतेला वाईट दिवस आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केली. 
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत दिग्विजयसिंह बोलत होते. अभिनेता रितेश देशमुख या सभेचे खास आकर्षण ठरला. त्याने केलेल्या खुमासदार भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही सभा पार पडली.
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याचा विकास केला आहे. त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे इंदापूरकर काँग्रेसच्या पाठीशी राहतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘ज्यांचे बोट धरून राजकारणात आले, त्यांच्या मुलीच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना प्रचाराला वेळ मिळाला नाही. आम्ही प्रामाणिकपणो काम केले. मतांचे मताधिक्य दिले. विधानसभेसाठी मात्र वेगळी चूल मांडायची, हा नेहमीचा डाव असतो. परंतु, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकासामुळे इंदापूरकर आमच्याबरोबरच आहेत, हे निवडणूक निकालात स्पष्ट होईल. इंदापुरातल्या सर्व सहकारी संस्था आम्ही स्थापन केल्या. अजित पवार मात्र दुस:यांनी सुरू केलेल्या संस्थांवर ठाण मांडून बसले आहेत. इंदापुरातील सहकारी संस्थांचे काम अजित पवारांनी पाहावे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव कारखान्यांची सध्या काय अवस्था आहे, याकडे पवार यांनी लक्ष द्यावे.’’या वेळी विलासराव वाघमोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  (वार्ताहर)
 
4दिग्विजयसिंह म्हणाले, ‘‘15 वर्षात आघाडीचे सरकार राज्यात यशस्वीरीत्या काँग्रेसने चालविले. काँग्रेसच्या हाताला धरून मोठे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वेगळी चूल मांडली. काँग्रेसची पाळेमुळे सर्वत्र पसरली आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री राज्याला लाभला. त्यामुळे प्रगती झाली. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले; मात्र त्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. 15 वर्षे सत्ता भोगल्यानंतर राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडण्याची गरज नव्हती. मात्र, शरद पवार यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा असल्याने सतत त्यांच्या विचारात बदल होतो.’’

 

Web Title: Indapur taluka development Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.