इंदापूर तालुक्यातील शेततळे कोरडे ठणठणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:27 PM2018-10-03T23:27:41+5:302018-10-03T23:28:05+5:30
वालचंदनगर : तळे कोरडे पडल्याने बागायती शेतीला धोका
वालचंदनगर : परिसरातील विहिरी व विंधनविहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शेतकऱ्यांबरोबरच सामान्य जनतेलाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांत होत असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यात थैमान घातले आहे. परंतु इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना वरदान ठरलेले शेततळे पावसाअभावी कोरडे पडले आहे. या शेततळ्याच्या विश्वासार्हताने हजारो हेक्टर फळबागांची लागवड करण्यात आलेली आहे. तळ्यातच नाही तर मळ्यात येणार कुठून, या म्हणीप्रमाणे हजारो हेक्टर द्राक्षे, डाळींब, पपई, ऊस, बागायती शेतीला धोकादायक ठरत आहे. शेततळ्यात पाणीच नसल्याने शेतकऱ्याने केलेले आर्थिकदृष्ट्या खर्च व कष्ट वाया जाणार असून, पुन्हा शेतकºयांना दुहेरी संकटाचा सामना करण्याची वेळ ओढवलेली आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सर्वच तालुक्यांच्या मानाने सर्वांत जास्ती शेततळी आहेत. शेतकºयाने शेतीला पाणीपुरवठा योग्य व व्यवस्थितपणे होण्यासाठी व दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे व ड्रीप या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेकडो एकर जमिनीवर शेततळे उभारण्यात आलेले आहेत. बहुतेक शेतकºयांना शेततळे देण्यात आलेले असून, अनुदानसहित मंजूर करण्यात आलेले आहेत. असंख्य शेतकºयांनी आपल्या स्वखर्चात एक एकर दोन एकरात शेततळी उभारली आहेत . परंतु विहिरी, विंधनविहिरीच्या पाण्याच्या पातळीत पावसाअभावी कमालीची घट झालेली असल्याने वरदान ठरलेले शेततळे शेतकºयांच्या बागांसाठी सध्यातरी शाप ठरलेले दिसत आहे. तालुक्यातील फळबागा जळून जात असल्यामुळे विहिरीत व विंधनविहिरीत पाणीच उपलब्ध नसल्याने शेततळ्याच्या विश्वासावर अवलंबून असणाºया शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे.