इंदापूर तालुक्याला ऑक्सिजनची कमतरता पडू देणार नाही : भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:09 AM2021-05-01T04:09:13+5:302021-05-01T04:09:13+5:30

इंदापूर येथील पुणे जिल्हा बँकेच्या सभागृहात तालुक्याची आढावा बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २९) पार ...

Indapur taluka will not be deprived of oxygen: Filling | इंदापूर तालुक्याला ऑक्सिजनची कमतरता पडू देणार नाही : भरणे

इंदापूर तालुक्याला ऑक्सिजनची कमतरता पडू देणार नाही : भरणे

Next

इंदापूर येथील पुणे जिल्हा बँकेच्या सभागृहात तालुक्याची आढावा बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २९) पार पडली. या वेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रताप, डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, बारामती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोबरे, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत कोकाटे, शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे तसेच तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भरणे म्हणाले की, ऑक्सिजनचा तुटवडा नुसत्या राज्यात नाही तर, देशभरात आहे. त्यामुळे सर्वत्र या संदर्भात ओरड होत आहे. तरीदेखील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा सध्या कोठेही नाही. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. इंदापूरच्या कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजन कमी पडणार नाही याची काळजी मी स्वतः घेत आहे. तर रेडिशन इंजेक्शन तुटवडा असला तरी देखील रुग्णांच्या गरजेनुसार ही इंजेक्शन उपलब्ध शासनस्तरावर केली जात आहेत. जे लसीकरण सुरू होणार आहे. यामध्ये लस कमी तालुक्याला पडणार नाही. याचे नियोजन सुरू आहे. तालुक्यामध्ये २६३६ रुग्ण उपचार घेत आहेत. इंदापुरात दोनशे बेडची व्यवस्था तत्काळ करण्यात येईल. इंदापूर तालुक्यात एकूण तेराशे बेड उपलब्ध करण्यावर माझा भर आहे, तर बावडा येथील शासकीय रुग्णालयाला तत्काळ ऑक्सिजनचे बेड सुरू केले जातील, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या वाढू नये यासाठी महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागाचे अधिकारी व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. तालुक्यात विनाकारण फिरणाऱ्या पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. भाजी मंडईत देखील नागरिकांनी गर्दी न करता, गरजेनुसार भाजीपाला खरेदी करावा. प्रत्येक नागरिकाने मास्क हा वापरलाच पाहिजे. विनाकारण बाहेर जाणे टाळले पाहिजे, असे आवाहन राज्यमंत्री भरणे यांनी केले आहे. इंदापूर येथे फिनोलेक्स कंपनीच्या माध्यमातून दोन अद्ययावत ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले आहेत.

इंदापूर येथील आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मान्यवर.

Web Title: Indapur taluka will not be deprived of oxygen: Filling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.