इंदापूरचा पाणीपुरवठा सुरळीत
By admin | Published: May 9, 2015 03:20 AM2015-05-09T03:20:16+5:302015-05-09T03:20:16+5:30
‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तानंतर सरस्वतीनगर येथील कार्यकर्ते बाळा ढवळे यांनी पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला. त्याची दखल घेऊन नगराध्यक्ष अशोक इजगुडे,
इंदापूर : ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तानंतर सरस्वतीनगर येथील कार्यकर्ते बाळा ढवळे यांनी पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला. त्याची दखल घेऊन नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी तातडीने सरस्वतीनगरसह शहरातील निम्म्या भागात माळवाडी नं. २ मधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला.
तरंगवाडी तलावात अत्यल्प पाणी शिल्लक होते. गाळमिश्रीत पाणी दिवसाआड पिण्यासाठी नगरपरिषद उपलब्ध करत होती.
पाटबंधारे खात्याकडे खडकवासला कालव्यामधून तरंगवाडी तलावात पाणी सोडावे या विषयी ही २२ दिवसांपासून नगरपरिषदेचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, न्यायालयाची प्रक्रिया आड येत असल्याने १२ मे नंतर पाणी येईल, असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी
स्पष्ट केले. लोकभावनेची आम्ही नेहमीच कदर केली आहे. आगामी काळात लोकांनी पाणी जपून
वापरावे. असे आवाहन नगराध्यक्ष इजगुडे, उपनगराध्यक्ष शहा यांनी केले आहे. (वार्ताहर)