इंदापूर होणार हगणदारीमुक्त

By admin | Published: November 25, 2015 12:58 AM2015-11-25T00:58:40+5:302015-11-25T00:58:40+5:30

येत्या ३१ डिसेंबरपर्यंत इंदापूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा इंदापूर नगरपरिषदेचा संकल्प आहे. त्यासाठी गांधीगिरी ते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापर्यंत सारे पर्याय नगरपरिषदेने खुले ठेवले आहेत.

Indapur will be cash-free | इंदापूर होणार हगणदारीमुक्त

इंदापूर होणार हगणदारीमुक्त

Next

इंदापूर : येत्या ३१ डिसेंबरपर्यंत इंदापूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा इंदापूर नगरपरिषदेचा संकल्प आहे. त्यासाठी गांधीगिरी ते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापर्यंत सारे पर्याय नगरपरिषदेने खुले ठेवले आहेत. याबाबत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली .
नगराध्यक्ष अशोक इजगुडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, आरोग्य विभागाच्या सभापती कमल पवार यांनी सांगितले, की, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी केंद्र शासनाने ८ हजार रुपये व राज्य शासनाने ४ हजार असे एकूण १२ हजार रुपयांचे अनुदान प्रत्येक शौचालयास देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण शहर हगणदारीमुक्त झाल्यानंतर राज्याच्या जिल्हा व राज्यस्तरीय समित्या त्याची पाहणी करणार आहेत. त्यांचा सकारात्मक अहवाल गेल्यानंतर नगरपरिषदांच्या श्रेणीनुसार ‘अ’ वर्ग पाच कोटी रुपये, ‘ब’ वर्ग तीन कोटी रुपये, ‘क’ वर्ग दोन कोटी रुपये या प्रमाणे सादरीकरणाचे अनुदान दिले जाणार आहे. काम समाधानकारक नसल्यास सर्व प्रकारच्या शासकीय अनुदानावर टाच येणार आहे.
५३० कुटुंबांनी शौचालय बांधकामासाठी अनुदान मिळण्यासाठी, नगरपरिषदेकडे अर्ज सादर केले आहेत. त्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ५० कुटुंबांचे अर्ज आॅनलाईन जमा करण्यात आले आहेत. वरिष्ठांच्या सुचनेनुसार सर्वेक्षण करून इतर कुटुंबे निश्चित करण्यात येणार आहे. ज्या कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालय बांधण्यास जागा उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी चार-पाच कुटुंबांसाठी एक याप्रमाणे सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कामठे म्हणाले, की उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा पथकाद्वारे गांधीगिरी करून त्यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात येणार आहे. आठ-दहा दिवसांच्या कालावधीत यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे. अन्यथा सबंधितांची हलगीच्या तालावर मिरवणूक काढून, इंदापूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द तक्रारी दिल्या जाणार आहेत. ही मोहीम शहर हगणदारीमुक्त होईपर्यंत सुरूच राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
(वार्ताहर)
पहिल्या आठवड्यात नगरपरिषद सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समिती, स्वच्छताविषयक चळवळ राबवणाऱ्या ‘ग्राम कुटा’ या संस्थेचे त्यासाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यात ‘गुड मॉर्निंग’ पथकाद्वारे पाहणी करून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा शोध घेवून त्यांना समज देण्यात येणार आहे. त्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात तीन महिला व दोन पुरुष कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- नानासाहेब कामठे,
मुख्याधिकारी, नगर परिषद

Web Title: Indapur will be cash-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.