इंदापूरची जागा काँग्रेसचीच, काँग्रेसच्याच वाट्याला येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 01:22 AM2019-03-04T01:22:32+5:302019-03-04T01:23:11+5:30
आपल्या पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील नेते माझी जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष्याला घेणार आहेत, असे आवाहन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.
बिजवडी : इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटलाना सुटणार की नाही याबाबतची चर्चा सर्व कार्यकर्त्यांनी थांबवावी कारण आपल्या पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील नेते माझी जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष्याला घेणार आहेत, असे आवाहन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.
इंदापूर येथे तालुका काँग्रेस च्या वतीने निकिता लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता संवाद शिबीरात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, आमदार विश्वजित कदम,सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे,पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप ,अंकिता पाटील आणि विश्वास मेहेंदळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले आपली लढाई आता जीवन मरणाची आहे कारण गेल्या पाच वर्षात आपल्याला किती त्रास सहन करावा लागला, पाच वर्षात शेतीला एकदाही पाणी मिळाले नाही एम आई डी सि मध्ये एकही नवीन कारखाना आला नाही, तालुक्यात १०० रुपयांची गुंतवणूक देखील झाली नाही, मराठी शाळेची एकही नवीन खोली बांधली नाही, माध्यमिक विद्यालयात एकही नवीन तुकडी नाही आणि एकही नवीन अंगणवाडी नाही. आपल्या शेतीला पाणी न मिळाल्याने हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले.
कार्यक्रमास नागराध्यक्ष अंकिता शहा, कृष्णा यादव, उदयसिंह पाटील, मयूर पाटील, मुकुंद शहा, शेखर पाटील, रघुनाथ राऊत, सुनील कणसे आणि रवींद्र साबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.
>तरुणांनी पाटील यांचा आदर्श घ्यावा : कदम
विश्वजित कदम म्हणाले राजकीय प्रवासाची दिशा ठरवताना मंत्रिमंडळात तरुणांनी कसे काम करावे याचा आदर्श हर्षवर्धन पाटील यांनी घालून दिला आहे. बावड्याच्या पाटील घराण्याने नेहमीच काँग्रेस पक्ष्याच्या विचाराचे काम केले आहे व आपल्या कामाचा राज्यात वेगळाच ठसा उमटवला आहे. इंदापुरची जागा ही काँग्रेस ची आहे आणि काँग्रेसशी चीच राहणार.त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणतीही चिंता न करता राज्याचे नेतृत्व आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी एकदिलाने कामाला लागले पाहिजे असे सांगितले.