बारामतीत सायबर कॅफेमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अश्लिल चाळे; कॅफे चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 08:54 PM2023-09-05T20:54:41+5:302023-09-05T20:54:54+5:30

कॅफेमध्ये पडदे लावून पार्टीशन केलेल्या जागेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले मुली एकांतात बसून करत होते अश्लिल चाळे

Indecent molestation of minors in cyber cafe in Baramati A case has been registered against the cafe driver | बारामतीत सायबर कॅफेमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अश्लिल चाळे; कॅफे चालकावर गुन्हा दाखल

बारामतीत सायबर कॅफेमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अश्लिल चाळे; कॅफे चालकावर गुन्हा दाखल

googlenewsNext

बारामती : नागरिकांनी दिलेल्या माहितीवरुन बारामती शहरात सायबर कॅफेवर पोलीसांनी मंगळवारी(दि ५) कारवाइ केली. यावेळी कॅफेमधील पडदे लावुन पार्टीशन केलेल्या जागेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले मुली एकांतात बसुन असभ्य वर्तन व अश्लिल चाळे करत असलेचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बारामती तालुका पोलीसांसह निर्भया पथक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने हि संयुक्त कारवाई केली. कॅफे ग्राउंड अप विदया कॉर्नर येथील कॅफेची अचानक तपासणी केली. यावेळी हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी मालक सुहास तानाजी कदम व मैनेजर मयुर बाळु कदम यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली. बारामतीमधील एमआयडीसी चाैक परीसरात अनेक सायबर कॅफे सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये महाविदयालयीन मुला मुलींना निवांतपणे गप्पा मारता येतील, असा व्यावसायिक दृष्टीकोने ठेवुन व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे कॅफेत जाण्याकडे तरूण तरूणीचा कल वाढला आहे. कॅफे व्यवसाय तेजीत आला आहे. त्यामुळे संबंधीत कॅफेचालकावरती कारवाई व्हावी, अशी नागरिकांमधून चर्चा होत होती.

याबाबत पोलीस निरीक्षक मोरे सांगितले की, पालकांनी सुदधा याबाबतीत गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. संबंधित सर्व कॅफे चालकाना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी कॅफेमधील पार्टिशन काढून नाही टाकले तर त्याचेवरती कठोर कारवाई करण्यात येईल.संबंधित कॅफेचालकाचे परवाने रदद करण्याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाइ करण्यात आली.

Web Title: Indecent molestation of minors in cyber cafe in Baramati A case has been registered against the cafe driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.