रूपाली चाकणकरांवर समाजमाध्यमांत अश्लील मजकूर; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 02:32 PM2023-07-12T14:32:44+5:302023-07-12T14:40:34+5:30

अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

Indecent text on social media on Rupali Chakankar; A case has been registered at the Cyber Police Station | रूपाली चाकणकरांवर समाजमाध्यमांत अश्लील मजकूर; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रूपाली चाकणकरांवर समाजमाध्यमांत अश्लील मजकूर; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमांत अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रूपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमांत मजकूर प्रसारित केला होता. त्या वेळी ॲड. विजयकुमार साखरे नावाच्या खातेधारकाने अश्लील भाषेत समाजमाध्यमांत प्रतिक्रिया नोंदवली. साखरे यांच्यानंतर अश्लील प्रतिक्रियेवर आणखी काहीजणांनी प्रतिक्रिया नाेंदविल्या. चाकणकर यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. रूपाली चाकणकर यांच्यासह चित्रा वाघ यांच्याविषयीही अश्लील प्रतिक्रिया नोंदवण्यात आली असून, त्यांच्या छायाचित्रात छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमांत अश्लील मजकूर प्रसारित करणाऱ्या खातेधारक, तसेच खात्याची तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Indecent text on social media on Rupali Chakankar; A case has been registered at the Cyber Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.