मैत्रिणीच्या मुलानेच पाठविला अश्लील व्हिडीओ, कर्वेनगर परिसरातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Updated: December 9, 2023 18:51 IST2023-12-09T18:50:44+5:302023-12-09T18:51:09+5:30
पुणे : मैत्रिणीच्या मुलानेच अश्लील व्हिडीओ पाठवत महिलेचा विनयभंग केला. २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान हा प्रकार घडला ...

मैत्रिणीच्या मुलानेच पाठविला अश्लील व्हिडीओ, कर्वेनगर परिसरातील घटना
पुणे : मैत्रिणीच्या मुलानेच अश्लील व्हिडीओ पाठवत महिलेचा विनयभंग केला. २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेने वारजे पोलिसांना फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी आकाश सुनील शहाणे (रा. कसबा पेठ) हा फिर्यादीच्या मैत्रिणीचा मुलगा आहे. त्याने फिर्यादी महिलेसह आसपास राहणाऱ्या आणि आरोपीच्या मोबाइलमध्ये संपर्कात असलेल्या महिला आणि पुरुषांना अश्लील फोटो, व्हिडीओ पाठविले. त्याबाबत विचारणा केली असता, शिवीगाळ करून वारंवार फोन करून त्रास दिला. याप्रकरणी आरोपी आकाश शहाणे याच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.