विविध प्रलंबित मागण्यासाठी वाघोलीत बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:45+5:302020-12-15T04:28:45+5:30
वाघोली मधील गट नंबर १४१९ मधील कचरा डेपी कायमस्वरूपी बंद करावा तर सन २००० पासून जिल्हाधिकाऱ्यांकडे गायरान गट ...
वाघोली मधील गट नंबर १४१९ मधील कचरा डेपी कायमस्वरूपी बंद करावा तर सन २००० पासून जिल्हाधिकाऱ्यांकडे गायरान गट नं १२९/१,११२३,१४१९,व १५६७ मधील प्रत्येक अतिक्रमणधारकांना निवासी प्रयोजनासाठी 1गुंठा भूखंड मंजुरी साठीच्या प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी द्यावी याशिवाय २००५ मध्ये सुयोग नगर मधील गट नं. १२९/१ येथे जिल्हा खनिज विकास निधीमार्फत उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व कामगारांना त्वरित पाण्याची सुविधा उपलब्ध करावी, आणि ग्रामपंचायत वाघोली यांनी गायरान गट नं १२९/१,११२३,१४१९,व १५६७ मधील सादर केलेल्या अतिक्रमणधारकांची यादी आक्षेपार्ह असल्याने ती कायम करू नये, वरिष्ठस्तरीय सर्वेक्षण समिती गठण करून पुर्नसर्वेक्षण करण्यात यावे या प्रमुख मागण्या आंदोलकांकडून करण्यात आलेले आहेत.
यावेळी नको नको महानगरपलिका नको, कचरा डेपो हटाव घरे वाचवा,अशा घोषणांनी उपोषण ला बसलेल्या महिला मोठं मोठ्याने घोषणा देत होत्या.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यत मागे हटणार नसल्याचे आंदोलकाकडून सांगण्यात आले. याप्रसंगी संतुलनचे बस्तु रेगे ,पल्लवी रेगे,कांताबाई पवार,पापाबाई कोकणे,तेजश्री मोहिती,रामा धोञे,लक्ष्मण पेटकर यांच्या सह मोठ्या संख्येने महिला, पुरुष, दगडखाण कामगार उपस्थित होते.