आदिवासी मजुरांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:11 AM2021-02-12T04:11:01+5:302021-02-12T04:11:01+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील १३ वनमजूर गेल्या काही वर्षांपासून वनविभागात काम करत आहेत. गेली अनेक वर्षे वनविभागामध्ये काम ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील १३ वनमजूर गेल्या काही वर्षांपासून वनविभागात काम करत आहेत. गेली अनेक वर्षे वनविभागामध्ये काम केल्यामुळे या वनमजुरांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी जून महिन्यात वनमजुरांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यानच्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मजुरांना कामावर येऊ नका, अशा तोंडी सूचना करत जून २०२०पासून त्यांचे वेतनही बंद केले आहे. काम देण्यासही अधिकारी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे वन विभागाच्या कारभाराविरोधात १३ वनमजुरांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी भीमाशंकर अभयारण्य क्र. १ यांनी दिलेल्या २४ ऑक्टोबर २०२० चे लेखी पत्राचे पालन करण्याबाबत लेखी द्यावे, प्रथम आम्हा १३ रोजंदारी वनमजुरांनी नियमित पूर्ववत काम देणे असे लेखी द्यावे, रोजंदारी वनमजुरांना कामावर येण्यास प्रतिबंध करु नये असे लेखी द्यावे, इतर मजूर कामावर ठेवले आहेत कसे किंवा नाहीत याबाबत लेखी द्यावे आदी मागण्या वनमजुरांनी केल्या आहेत.
या आंदोलनाला बिरसा ब्रिगेड सह्याद्री आंबेगाव खेड जुन्नर, तसेच आदिवासी विचारमंच महाराष्ट्र राज्य यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनामध्ये प्रदीप डामसे,काळुराम कोंढवळे,बाळु भोईर,दत्ताञय वनघरे,एकनाथ हिले, लक्ष्मण लांघी, हेमंत तळपे, संतोष केडे,किशोर केंगले, सचिन कुर्हाडे, नारायण गवारी, ज्ञानेश्वर भोईर,अनिल लोहकरे, सहभागी आहेत.
११ तळेघर
वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनास बसलेले वनमजूर.