नारायणगाव व वारूळवाडी परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:23+5:302021-08-17T04:16:23+5:30
वारूळवाडी येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरामध्ये मंडळाचे संचालक तानाजी वारुळे यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या ...
वारूळवाडी येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरामध्ये मंडळाचे संचालक तानाजी वारुळे यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक रवींद्र वाघोले, प्राचार्य श्रीकांत शेवाळे, सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी एन.सी.सी. लीडर संस्कृत शिंदे, सृष्टी डोंगरे, ऋतुजा धुमाळ, विवेक डेरे, वैष्णव टेमगिरे यांनी एन.सी.सी. प्रमुख दिलीप शिवणे, सुनील ढवळे, रोहित भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजास मानवंदना दिली.
वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व जिल्हा परिषद शाळा, कृषी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत वारूळवाडी कार्यालयाचे ध्वजावंदन गावचे प्रथम नागरिक सरपंच राजेंद्र मेहेर यांच्या हस्ते असताना मेहेर यांनी खऱ्या अर्थाने दोन वर्षांच्या कोरोनाकाळात गावाची काळजी घेत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आशा वर्कर सुनंदा बर्वे, संगीता वारुळे,अर्चना वारुळे, स्वाती बोऱ्हाडे, अश्विनी वारुळे, रेखा लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान दिला. यावेळी सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्राम विकास अधिकारी एस.एन.गवारी, ज्येष्ठ नागरिक रमेश पाटे, वसंत कोल्हे व ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते. बहुउद्देशीय कृषी तंत्रज्ञान केंद्र -उपसरपंच माया डोंगरे, जि.प.शाळा वारूळवाडी (जुनी)- ग्रा.पं.सदस्या स्नेहल कांकरिया , प्राथमिक आरोग्य केंद्र- ग्रा.पं.सदस्या वैशाली मेहेर ,जि.प.केंद्र शाळा - ज्योती संते ,जि.प.शाळा ठाकरवाडी- ग्रा.पं.सदस्या राजश्री काळे , जि.प.शाळा आनंदवाडी- ग्रा.पं.सदस्य विनायक भुजबळ ,रेखा फुलसुंदर ,जि.प.शाळा नंबरवाडी- ग्रा.पं.सदस्य जंगल कोल्हे ,संगीता काळे, जि.प.शाळा वळणवाडी- ग्रा.पं.सदस्य सोनलअडसरे, अंगणवाडी केंद्र चिमणवाडी- ग्रा.पं.सदस्य प्रकाश भालेकर, शुभांगी कानडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नारायणगावात ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई, तिरंगी झेंड्याची रोषणाई व गावातील बाजारपेठेत तिरंग्या रंगाच्या झिरमुळ्या व फुग्यांची सजावट करून देशभक्तीपर गीत लावून गावातून प्रभातफेरी काढून देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येलाच नारायणगावमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते व तलाठी कार्यालय येथील मंडलाधिकारी डी. बी. काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कुरण येथील जयहिंद पाॅलिटेक्निक व जयहिंद इंजिनिअरिंग काॅलेज येथे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शैक्षणिक संकुलामध्ये स्वातंत्र्य दिन १२५ झाडांचे वृक्षारोपण केले. या वेळी संचालिका अंजली गुंजाळ, इंदुमती गुंजाळ, शुभांगी गुंजाळ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस. गल्हे, जयहिंद इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, पॉलिटेक्निकचे प्राचार्य योगेश गुंजाळ, जयहिंद इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. किरण पैठणकर तसेच जयहिंद शैक्षणिक संकुलाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नारायणगाव पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या हस्ते, तर कुकडी पाटबंधारे विभाग कार्यालय, नारायणगाव येथे कार्यकारी अभियंता आमदार अतुल बेनके यांचे हस्ते ध्वजारोहण झाले.
1) वारूळवाडी ग्रामपंचायतीचे आशा सेविकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.