वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांचे स्वातंत्र्यदिनी बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:36+5:302021-08-18T04:14:36+5:30
क्रांतिदिन सप्ताहनिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात नुकत्याच विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक ...
क्रांतिदिन सप्ताहनिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात नुकत्याच विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक व देशप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला. या वेळी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक दक्षता कमिटीच्या वतीने पिंगळे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. कमिटीचे प्रमोद फुलसुंदर यांनी सांगितले की, वक्तृत्व, निबंध व चित्रकला या स्पर्धांमध्ये ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रभाकर मुसळे, जगन्नाथ आल्हाट, महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे पी. बी. जगताप, अविनाश कुंभार यांनी परीक्षण केले.
विविध स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी तळेगाव ढमढेरेचे उपसरपंच नवनाथ ढमढेरे, ग्रामपंचायत सदस्य अॅड.सुरेश भुजबळ, मनोज अल्हाट, प्रशांत गायकवाड, चंद्रकांत भुजबळ, पंडित भुजबळ, चेतना ढमढेरे, संतोष भुजबळ, संदीप ढमढेरे, नवनाथ भुजबळ, गोपाळ भुजबळ, सागर दरेकर, नवनाथ खरपुडे, शोभा हिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत नरके यांनी केले, तर नवनाथ भुजबळ यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल :
निबंध स्पर्धा, प्राथमिक गट : प्रणाली गुजरे, तनिषा चव्हाण (कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथ. शाळा), श्रेयस काशिकर (श्री पांडुरंग विद्या मंदिर, विठ्ठलवाडी), आयुष खेडकर, श्रीयश शिंदे (कुमार जयसिंगराव ढमढेरे, प्राथ.शाळा).
माध्यमिक गट : मानसी घाडगे (हॉली स्पिरिट स्कूल, लोणीकंद), आरती गायकवाड (संभाजीराव भुजबळ विद्यालय), धनराज तळेकर, अभय गवारी (श्री पांडुरंग विद्या मंदिर, विठ्ठलवाडी), समृध्दी फुलावरे (संभाजीराव भुजबळ विद्यालय). खुला गटः अश्विनी नरके (भारतीय जैन संघटना, वाघोली), निकिता भुजबळ, अरुण आलेवार (भंडारा), ज्योती भुजबळ (कासारी,) रेवती घुबे.
चित्रकला स्पर्धा:
प्राथमिक गटः उत्कर्षा इंगळे (ज्ञानवर्धिनी विद्यालय), श्रेयश गवारी (सनराईज इंग्लिश स्कूल), दीपेश पाटील (कु. जयसिंगराव ढमढेरे प्राथ.शाळा), वैष्णवी स्वामी (जि.प.शाळा, ढेरंगेवस्ती), मानसी ढमढेरे (इंटरनॅशनल शाळा, वाबळेवाडी).
माध्यमिक गट : भूमिका देशमुख (आर. बी. गुजर प्रशाला), समृद्धी सुरवाडे (जि.प. शाळा, कोरेगाव), ओम गवारी,(श्री पांडुरंग विद्या मंदिर, विठ्ठलवाडी), अनिशा रसाळ (ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे) भक्ती शेंडगे (कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथ.शाळा), प्रज्ञा पाटील (हॉली स्पिरिट इंग्लिश स्कूल, लोणीकंद) खुला गट : गायत्री वाळके (आर. बी. गुजर प्रशाला), अमृता घोडेकर, रेवती घुबे, नेहा भुजबळ, प्रणाली रासकर, (समाज भूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय)
क्रांतिदिन सप्ताह वक्तृत्व स्पर्धा
प्राथमिक गट : अर्णव परेश महाजन, सोहम आल्हाट (कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथ. शाळा),अनन्या खरपुडे, सृष्टी गावंडे
माध्यमिक गट : सोहम ढमढेरे, श्रावणी राऊत (कु. जयसिंगराव ढमढेरे प्राथ. शाळा नं. २), अविनाश वारकरी, राजनंदिनी गवारे (श्री पांडुरंग विद्या मंदिर, विठ्ठलवाडी), सिध्दार्थ पारखे, खुला गट : नीलिमा नरके
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक दक्षता कमिटीच्या वतीने आयोजित विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण प्रसंगी विजेते विद्यार्थी व मान्यवर.
170821\img_20210815_144501.jpg
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक दक्षता कमिटीच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण