स्वातंत्र्यदिन विशेष मोहीम! पुण्यातील तीन हजार गुंडांची झाडाझडती; ६१ गुंड जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 05:37 PM2022-08-14T17:37:48+5:302022-08-14T17:38:11+5:30

गुंडांकडून पिस्तूल, काडतुसे, कोयते, तलवारी असा शस्त्रसाठा जप्त

Independence Day Special Campaign Three thousand goons in Pune felled 61 gangsters in the net | स्वातंत्र्यदिन विशेष मोहीम! पुण्यातील तीन हजार गुंडांची झाडाझडती; ६१ गुंड जाळ्यात

स्वातंत्र्यदिन विशेष मोहीम! पुण्यातील तीन हजार गुंडांची झाडाझडती; ६१ गुंड जाळ्यात

Next

पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवून गुंडांची झाडाझडती घेतली. पोलिसांनी शहरातील ३ हजार ३८१ गुंडांची तपासणी केली. त्यापैकी ५४७ गुंड त्यांच्या घरी वास्तव्यास असल्याचे आढळून आले. गुंडांकडून पिस्तूल, काडतुसे, कोयते, तलवारी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

गुन्हे शाखेने पिस्तूल बाळगणाऱ्या दोन गुंडांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांच्या विरोधात कारवाई करून पोलिसांनी ३५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून २९ कोयते, तलवारी, पालघन, खंजीर, मोबाइल संच, दुचाकी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हडपसर भागात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार आरोपी आकाश मोहन कांबळे (रा. फुरसुंगी) तसेच चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार आरोपी जय विटकर, अनिल विटकर (रा. लाल चाळ, गोखलेनगर) यांना अटक करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाने पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आकाश अरुण पवार (रा. दत्तनगर, कात्रज) याला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले.

पोलिसांनी बेकायदा गावठी दारू विक्रीप्रकरणी ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी दारू तसेच साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत शहरातील हाॅटेल, लाॅजची तपासणी करण्यात आली. वाहतूक शाखेकडून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. मुंबई प्रतिबंधक कायद्यान्वये १३ जणांना अटक करण्यात आली. तसेच सराईतांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाटगे, प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहिदास पवार, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यातील पथके विशेष मोहिमेत सहभागी झाले होते.

Web Title: Independence Day Special Campaign Three thousand goons in Pune felled 61 gangsters in the net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.