कंत्रटी कामगारांना हवा स्वतंत्र विभाग
By admin | Published: December 10, 2014 12:06 AM2014-12-10T00:06:49+5:302014-12-10T00:06:49+5:30
पालिकेत ठेकेदारी पद्धतीने घेतल्या जाणा:या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा, अशी मागणी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.
Next
पुणो : पालिकेत ठेकेदारी पद्धतीने घेतल्या जाणा:या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा, अशी मागणी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. या कामगारांना ठेकेदारांकडून कायद्यानुसार वेतन व सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. या पाश्र्वभूमीवर हा विभाग सुरू करण्याची मागणी बागुल यांनी केली आहे.
पालिकेत सुमारे 4 हजार कंत्रटी कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी व कायद्याचे पालन न करणा:या ठेकेदारांचे ठेके तत्काळ रद्द करावेत यासाठी स्वतंत्र विभाग असावा, अशी मागणी बागुल यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
4पालिकेच्या आरोग्य, घनकचरा, अतिक्रमण, मलनि:सारण, उद्यान, सुरक्षा तसेच पाणीपुरवठा या विभागांत 4 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनापोटी पालिका दरवर्षी 5क् कोटी रुपये खर्च करते.
4राज्य शासनाच्या आदेशानुसार, या कर्मचा:यांना दरदिवशी सुमारे 432 रुपये वेतनदेणो बंधनकारक आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनही संबंधित ठेकेदाराला कर्मचा:यांच्या संख्येनुसार, प्रतिदिन 432 रुपये देते. त्यानुसार, ठेकेदारांकडून प्रत्येक कर्मचा:याला दरमहा नऊ ते साडेनऊ हजार रुपये वेतन देणो आवश्यक असताना, प्रत्यक्षात दरमहा साडेचार ते पाच हजार रुपयेच या कर्मचा:यांच्या हातावर टेकवले जातात.
4त्यामुळे या कर्मचा:यांवर अन्याय होतो. तसेच, त्यांचा पीएफ भरणो आवश्यक असताना, तो भरला की नाही, तो संबधित कर्मचा:याला मिळाला का, याची कोणतीही
नोंद पालिकेकडून पाहिली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत नाही. त्यामुळे
या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी हा कक्ष स्थापन करावा, अशी मागणी त्यांनी
केली आहे.