पालखीच्या निधीबाबत स्वतंत्र सभा

By admin | Published: June 29, 2015 11:50 PM2015-06-29T23:50:11+5:302015-06-29T23:50:11+5:30

बारामती नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभा काही मिनिटात गुंडाळली. त्यानंतर दुपारी १ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात पालखी सोहळ्यानिमित्त

Independent meeting on fund of Palkhi | पालखीच्या निधीबाबत स्वतंत्र सभा

पालखीच्या निधीबाबत स्वतंत्र सभा

Next

बारामती : बारामती नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभा काही मिनिटात गुंडाळली. त्यानंतर
दुपारी १ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात पालखी सोहळ्यानिमित्त नगरपालिकेला शासनाकडून मिळालेल्या २ कोटी रुपये
मिळालेल्या निधीचा सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत विनियोग करणे, यासाठी स्वतंत्र सभेचे आयोजन केले होते. मात्र, विशेष सर्वसाधारण सभेतच हा विषय झाला असल्याचे सांगून पदाधिकारी आणि प्रशासनाने वेळ मारून नेली.
मोर्चाचा गोंधळ सुरू असतानाच विशेष सर्वसाधारण सभा संपविण्यात आली होती. त्याच दरम्यान, दुपारी १ वाजता राज्य शासनाच्या निर्णयानुसार ज्या ठिकाणी पालखी सोहळ्यांचा मुक्काम आहे. त्या भागातील विकास कामांसाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. बारामती पालिकेला २ कोटी रुपयांचा निधी यासाठी मिळाला आहे.
हा निधी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत खर्च करायचा आहे. त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा संपल्यानंतर स्वतंत्र सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेबाबत सुभाष ढोले यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना जवळपास अर्ध्या तासानंतर विचारणा केली. तेव्हा विशेष सर्वसाधारण सभेच्या मिटिंगमध्येच हा विषय मंजूर करण्यात आला, असे त्यांना सांगण्यात आले. सभागृहात तीन नगरसेवकांसह अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. ते देखील दुपारच्या सभेची वाट पाहत होते.
पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे नेमके काय चालले आहे, याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्यासह नगराध्यक्षांनी देखील सर्व विषय अगोदरच्या सभेतच झाले आहेत, असे सांगून नगराध्यक्षांसह सर्वांनी त्यांचे दालन सोडले. याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले म्हणाले, नगराध्यक्षांच्या सहीने स्वतंत्र सभा आयोजित करण्यात आली होती. विशेष सभेत देखील चर्चा झाली नाही. आता त्याच सभेत हा विषय मंजूर करण्यात आला, ही बाब न पटणारी आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचे नगरसेवक संजय लालबिगे यांनी सांगितले. विरोधी नगरसेवक सुनिल सस्ते यांनी वाढीव हद्दीत केलेल्या चुकीच्या कामांवर पांघरून टाकण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.
नगराध्यक्ष सुभाष सोमाणी म्हणाले, की हा विषय मंजूर करून सार्वजनिक बांधकाम मार्फत कामे करून घ्यायचा असल्याने अगोदरच्या मिटिंगमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली. विशेष सभेचे विषय कमी असल्याने पालखी सोहळ्याच्या या विषयाला देखील त्याच सभेत मंजुरी देण्यात आली.
(प्रतिनिधी)

गोंधळात कोरमचा विसर...
या गदारोळात सभेला उपस्थित असलेल्या नगरसेवकांच्या उपस्थितीच्या सह्या घेण्याचा विसर पडला होता. दुपारी दीड वाजेपर्यंत जेमतेम १५ नगरसेवकांच्या सह्या झाल्या होत्या. एकूण नगरसेवकांमध्ये विषय मंजुरीला किमान १६ नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक आहे. तसे चित्र मात्र दिसले नाही.
तांदूळवाडीतील सर्व कामे मार्गी...
तांदूळवाडीच्या विकास कामांच्या बाबत मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, एकूण १२१ रस्त्यांच्या कामांना नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यापैकी ४७ कामे तांदूळवाडीमधील आहेत, असा दावा स्थानिक नगरसेवक जय पाटील यांनी केला. गावठाणासह सर्व रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. त्याचबरोबर भुयारी गटारांची कामे देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Independent meeting on fund of Palkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.