वाढीव पोलीस मनुष्यबळाबाबत स्वतंत्र प्रस्ताव - विश्वास नांगरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:28 AM2017-12-10T01:28:46+5:302017-12-10T01:28:58+5:30

जिल्ह्यातील ५० ते ६० लाख लोकसंख्येसाठी पोलिसांचे केवळ ३१५० मनुष्यबळ आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे अपुºया असणा-या पोलीस प्रशासनावर ताण येतो. हा ताण टाळण्यासाठी पोलीसबळ वाढविण्याची गरज आहे.

 Independent proposal for increased police force - Vishwas Nangre-Patil | वाढीव पोलीस मनुष्यबळाबाबत स्वतंत्र प्रस्ताव - विश्वास नांगरे-पाटील

वाढीव पोलीस मनुष्यबळाबाबत स्वतंत्र प्रस्ताव - विश्वास नांगरे-पाटील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : जिल्ह्यातील ५० ते ६० लाख लोकसंख्येसाठी पोलिसांचे केवळ ३१५० मनुष्यबळ आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे अपुºया असणा-या पोलीस प्रशासनावर ताण येतो. हा ताण टाळण्यासाठी पोलीसबळ वाढविण्याची गरज आहे. याबाबत शासनाला सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.
बारामती येथे आयोजित बैठकीत नांगरे-पाटील बोलत होते. या वेळी नांगरे-पाटील म्हणाले, की सर्वसामान्य नागरिकांसाठी पोलिसांचा १००, १०९१ क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे याद्वारे कंट्रोल रूमच्या माध्यमातून त्वरित प्रतिसाद देण्याचा प्रयत्न होतो. बारामती एमआयडीसीला स्वतंत्र पोलीस चौकी, पोलीस कर्मचारी देण्याचे विचाराधीन आहे. केवळ सण, निवडणुकीत कार्यरत असणारा गृहरक्षक दलाचा जवान, पोलीसपाटील यांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करता येणे शक्य आहे.
बारामतीसारख्या चांगल्या शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत, याबाबत नांगरे पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले. सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गुन्ह्यांचे प्रमाण घटण्यास मदत होईल. तसेच, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे शक्य होईल. छेडछाडीसारख्या प्रकरणांमध्ये २० हजार तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. आर्थिक वगळता सर्वच प्रकारचे गुन्हे तक्रार दिल्यानंतर दाखल करण्याचे पोलिसांना आदेश आहेत, असे नांगरे-पाटील म्हणाले.
निर्भया पथकाचे कर्मचारी खासगी वेशात जातात. त्यांना छुपे कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामधून आरोपीच्या सर्व हालचाली ‘रेकॉर्ड’ होतात. त्यानंतर २४ तासांत ‘चार्जशीट’ दाखल होते. १२ दिवसांत २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जलदगतीने ही प्रक्रिया करण्यात आल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. छेडछाड करणाºया युवकांचे, विवाहित पुरुषांचे समुपदेशन करण्यात येते. त्यासाठी युवकांना त्यांच्या आई-वडिलांसमवेत व विवाहित पुरुषांना त्यांच्या पत्नीसोबत बोलाविण्यात येते, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी लोककेंद्रित सेवा देण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक दीपाली केदारी, पोलीस निरीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौंड यांनी आभार मानले.

...त्या चोराने जोडले सीसीटीव्ही कॅमे-याला हात

सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांवर जरब बसण्यास मदत होते. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याने एकाच्या खिशातील पॉकेटची चोरी केली. मात्र, समोर सीसीटीव्ही लावला आहे. त्यामध्ये हा प्रकार चित्रीत झाला आहे, याची जाणीव त्या चोराला झाली. त्याने तातडीने ते पाकीट खाली टाकले. त्यानंतर पाकिटाची मालकी असणाºया व्यक्तीला पाकीट खाली पडल्याचे सांगितले.

जाताना त्या चोराने अक्षरश: सीसीटीव्ही कॅ मेºयालाच हात जोडले. सीसीटीव्हीचा असाही झालेला फायदा एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पािहल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

...बारामती एमआयडीसीला स्वतंत्र पोलीस चौकी
बारामती एमआयडीसीला स्वतंत्र पोलीस चौकी, तसेच पोलीस कर्मचारी देण्यासाठी विचाराधीन आहे, यासाठी प्रयत्नशील राहू.
तसेच बारामती शहरासाठी १५ वाहतूक पोलीस, वाहतूक पोलीस उपनरीक्षक स्वतंत्र देण्यासाठी पोलीस अधीक्षकांना सूचना देण्यात येतील, असे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे एमआयडीसी क्षेत्राची सुरक्षा, बारामती शहरातील वाहतूक समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
 

Web Title:  Independent proposal for increased police force - Vishwas Nangre-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.