संपूर्ण जगाचे कल्याण चिंतणारा भारत देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:18 AM2021-02-23T04:18:57+5:302021-02-23T04:18:57+5:30

भरत नाट्य मंदिर येथे नादब्रह्म ढोल-ताशा व ध्वज पथकातर्फे आयोजित नादब्रह्म पुरस्कार आणि संजीवनी नादब्रह्म पुरस्कार वितरण सोहळ्यात ते ...

India is a country that cares about the welfare of the whole world | संपूर्ण जगाचे कल्याण चिंतणारा भारत देश

संपूर्ण जगाचे कल्याण चिंतणारा भारत देश

googlenewsNext

भरत नाट्य मंदिर येथे नादब्रह्म ढोल-ताशा व ध्वज पथकातर्फे आयोजित नादब्रह्म पुरस्कार आणि संजीवनी नादब्रह्म पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, भरत मित्रमंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, दत्ता सागरे, दीपक मानकर, गणेश घुले, पराग ठाकूर, धनंजय वाडकर, नादब्रह्म पथकाचे संस्थापक अध्यक्ष अतुल बेहेरे आदी उपस्थित होते.

कोरोना काळात समाजासाठी बहुमूल्य योगदान दिलेल्या डॉ. गौतम छाजेड आणि जावेद खान यांना नादब्रह्म पुरस्कार, तर अशोक तुपे यांना गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

तसेच कार्यक्रमात सारंग सराफ, सचिन जामगे, ॠषिकेश बालगुडे, समीर धनकवडे, निरंजन दाभेकर, आनंद सागरे, नगरसेवक अजय खेडेकर, धीरज घाटे, वसंत मोरे, शिरीष मोहिते, राजाभाऊ भिलारे, चंद्रकांत सणस, उदय जोशी, रामलिंग शिवणगे, दीपक मानकर, किरण सावंत, छाया जगताप यांना संजीवनी नादब्रह्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी नादब्रह्म पथकातर्फे अयोध्येतील राम मंदिर निर्माणाकरिता १ लाख रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला.

वंजारवाडकर म्हणाले, की

संकटकाळात मदतीचा हात दिलेल्या, भुकेलेल्यांना जेवण दिलेल्या, मृतांवर संस्कार करणा-या, गरजू कुटुंबांना मायेचा आधार देणा-या सेवाव्रतींमध्ये केवळ मोठेपणाचा नाही, तर कृतज्ञतेचा भाव आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे. धैर्य, संयम, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि शासनांच्या सूचना पाळणारा सामान्य पुणेकर देखील कोरोना योद्धा आहे.

पराग ठाकूर म्हणाले, की जेव्हा कोरोनाच्या उन्हाचे चटके समाजाला लागत होते, तेव्हा माणुसकीचे झरे बनून सेवेक-यांनी कार्य केले आहे. माणूस माणुसकीला परका झाला होता, त्यावेळी रस्त्यावर उतरुन अनेकजण काम करीत होते. अशा माणसांच्या गुणांचे कौतुक वादनापलिकडे जाऊन एका ढोल-ताशा पथकाने करणे ही विशेष बाब आहे.

-----------------------------

जावेद खान यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणाकरिता दिले ११ हजार रुपये

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील राम मंदिर निर्माणाचे कार्य मोठे आहे. त्यामध्ये आम्हाला देखील यामध्ये सहभागी करून घ्या. आज पुरस्कारासोबत मिळालेली ११ हजार रुपयांची रक्कम मी राममंदिराकरिता देत असल्याचे नादब्रह्म पुरस्कारप्राप्त जावेद खान यांनी यावेळी सांगितले.

Web Title: India is a country that cares about the welfare of the whole world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.