Video: पुण्यात सुरू झालय भारतातील पहिलं पिझ्झा एटीएम; तरुणाची नवी संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:54 PM2022-01-31T18:54:36+5:302022-01-31T18:56:03+5:30
तरुणाने एटीएममधून चक्क आता पिझ्झा मिळणार असल्याची भन्नाट आयडिया समोर आणली आहे
पुणे: पुणेकर खाण्याचे शौकीन आहेत. हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. स्नॅक्स, हॉटेलमधील पदार्थ याबरोबरच फास्ट फूडला पुणेकर सोडत नाहीत. फक्त खाण्यासाठी मैलोगंती प्रवास करणारे नागरिकही पुण्यातच पाहायला मिळतात. त्यामुळे खाण्याच्या बाबतीत हॉटेल व्यावसायिकही क्रिएटिव्ह आयडिया वापरू लागले आहेत. आपल्या हॉटेलकडे पुणेकर कसे आकर्षित होतील असाही ते प्रयत्न करू लागले आहेत. त्यातच पुण्यात एका २४ वर्षीय तरुणानं नवी संकल्पना आणली आहे. आपण एटीएममधून नेहमी पैसे काढत असतो. पण एटीएममधून चक्क आता पिझ्झा मिळणार असल्याची भन्नाट आयडिया त्याने समोर आणली आहे.
पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या कुमार पेसिफिक मॉल मध्ये धैर्य शहा नावाच्या तरुणाने हे एटीएम सुरू केले आहे. पिझ्झाच्या एटीएममधून अनेक प्रकारच्या व्हरायटी आपल्याला खाता येणार आहेत. या पिझ्झा एटीएममुळे नागरिकांना पिझ्झा त्वरित उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हा पिझ्झा पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यामुळे प्युअर व्हेज पिझ्झा येथे खायला मिळणार आहे. अगदी लहानांपासून मोठ्या पर्यंत हा पिझ्झा बिनधास्त खाता येणार आहे.
एटीएममधून ज्याप्रमाणे प्रोसेस करून पैसे काढले जातात. त्याचप्रमाणे अवघ्या तीन मिनिटात ग्राहकांना पिझ्झा आपल्याला मिळणार आहे.
पुण्यात सुरू झालंय भारतातील पहिलं पिझ्झा एटीएम #Pune#pizzapic.twitter.com/xo292e5l0K
— Lokmat (@lokmat) January 31, 2022