तिरंदाजी खेळाला भारतात मोठा इतिहास :ए. एस. क्रुझ, राष्ट्रीय अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 07:01 PM2018-04-05T19:01:28+5:302018-04-05T19:01:28+5:30
सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय तिरंदाजी महासंघाच्या मान्यतेने राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेला गुरुवारी पुण्यात दिमाखात सुरवात झाली.
पुणे: युद्धाप्रमाणे खेळातही नियोजन, तयारी आणि अभ्यास महत्वाचा असतो. यामुळे खेळाडू हा सशक्त बनतो. परिणामी कुठल्याही परिस्थितीत तो खेळु शकतो. भारतात नेमबाजी आणि तिरंदाजी या खेळांना इतिहास आहे. गेल्या काही वषार्तील कामगिरी बघता भारताच्या नावाने हे खेळ जगात ओळखू जाऊ लागले आहे, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंत जनरल तसेच क्रीडा प्रकारातील वैद्यकीय तज्ज्ञ ए. एस. क्रुझ यांनी केले.
सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय तिरंदाजी महासंघाच्या मान्यतेने राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेला गुरुवारी पुण्यात दिमाखात सुरवात झाली. ही स्पर्धा आर्मी इन्स्टिट्यूटच्या मुंढवा रोड येथील आउटडोअर रेंज वर १२ एप्रिल पर्यंत सुरु असणार आहे. या स्पर्धेत इंडियन राउंड,रिकर्व्ह आणि कंपाउंड राऊंड मध्ये स्पर्धक आपले नशीब आजमावणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. एस. ए. क्रुझ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्रिगेडीयर (निवृत्त) पिकेएम राजा, आणि भारतीय तिरंदाजी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे तसेच स्पधेर्चे उदघाटक म्हणून क्रूझ बोलत होते. क्रूझ म्हणाले, भारतीय खेळाडूंच्या रक्तात पूर्वजांचे गुण आहेत. यामुळे ते चांगली कामगिरी करू शकतात. यासाठी त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्युशनतर्फे हे काम चांगल्या पद्धतीने केले जात आहे.लेफ्टनंट कर्नल ए.एन. झा यांनी स्पर्धेची माहिती देतांना सांगितले,या स्पर्धेत राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि इतर असे ३९ संघ सहभागी होत असून ९०० तिरंदाज सुवर्ण,रौप्य, आणि कांस्य पदकांसाठी आपले नशीब आजमावणार आहे. महिला, पुरुष आणि मिश्र अशा ६ विविध गटात विजेतेपद आणि एक सर्वसाधारण विजेतेपद असणार आहे.
१२ एप्रिल पर्यंत सुरु असणाºया या स्पर्धेत इंडियन राउंड राष्ट्रीय पातळीवर संपुष्टात येणार असून रिकर्व्ह आणि कंपाउंड प्रकारातील पहिल्या ८ मध्ये येणारे खेळाडू २०१८ मध्ये होणाºया आशियाई स्पर्धेच्या चाचणी स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये तरुणदीप राय, जयंता तालुकदार, राहुल बॅनर्जी, मंगल सिंग चंपिया, अंतनु दास,दीपिका कुमारी, एमएस एल बम्बलादेवी,लक्ष्मी रानी माझी, एमएस रिमेल बरुली आणि एमएस व्ही. पॅनेटा या सारख्या ३० हुन अधिक आंतरराष्ट्रीय तिरंदाजांच्या निशाणेबाजीचा अनुभव पुणेकरांना घेता येईल.