Covid 19 | काेराेनाबाबत भारताला घाबरण्याची गरज नाही- आदर पूनावाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 10:43 AM2022-12-22T10:43:20+5:302022-12-22T10:44:07+5:30
चीनमध्ये काेराेना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, लाॅकडाउनसदृश स्थिती उद्भवली आहे...
पुणे :चीनमध्ये काेराेना रुग्ण वाढत असले, तरी भारताला काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण, आपल्याकडे माेठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे, असा ट्वीट सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केले आहे. चीनमध्ये काेराेना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, लाॅकडाउनसदृश स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे भारतासह जगातील इतर देशही धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे दिलासादायक विधान केले आहे.
The news of rising COVID cases coming out of China is concerning, we need not panic given our excellent vaccination coverage and track record. We must continue to trust and follow the guidelines set by the Government of India and @MoHFW_INDIA.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) December 21, 2022
दरम्यान, चीनमधील काेराेना उद्रेकाच्या धर्तीवर केंद्रीय आराेग्य विभागाने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अशावेळी पूनावाला यांनी आश्वासक ट्वीट केले आहे. काेराेनाची भीती घेण्याची आवश्यकता नसून, केंद्रीय आराेग्य खात्याने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करायला हवी.