विज्ञान-तंत्रज्ञानात भारत लवकरच " लीडर " : डॉ. रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 07:24 PM2019-10-05T19:24:57+5:302019-10-05T19:25:25+5:30

उद्योगाकडे वळणाऱ्या तरूणांनी बेडुक उडी न घेता हनुमान उडी घ्यायला हवी.

India soon '' leader '' in science and technology: Dr. Raghunath Mashelkar | विज्ञान-तंत्रज्ञानात भारत लवकरच " लीडर " : डॉ. रघुनाथ माशेलकर

विज्ञान-तंत्रज्ञानात भारत लवकरच " लीडर " : डॉ. रघुनाथ माशेलकर

Next

पुणे : विज्ञानतंत्रज्ञान, नाविन्यता या गोष्टींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. लोकांमध्ये विज्ञानाविषयी प्रचंड उत्सुकता असून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापरही होत आहे. या क्षेत्रामध्ये तरूणांना अधिक संधी देण्यासाठी सकारात्मक धोरणे आखली जात आहेत. यांसह लोक सहभागातून देश लवकरच विज्ञान व तंत्रज्ञानात जगात '' लीडर'' म्हणून पुढे येईल, असा विश्वास प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला. 
आयसीएफएआय बिझनेस स्कुल, इन्स्टिट्यूट फॉर जनरेटिव्ह लीडरशिप, होप फाउंडेशनचे आयस्क्वेअरआयटी इंजिनिअरिंग कॉलेज आणि बीडब्ल्यू बिझनेसवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसºया इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवलच्या (आयबीएलएफ) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ह्यकेपीआयटीह्णचे सहसंस्थापक रवी पंडित, उद्योजक डॉ. गणेश नटराजन, ह्यबिझनेस वर्ल्डह्णचे डॉ. अनुराग बत्रा,  ह्यआयसीएफएआयह्णच्या संचालिका प्रा. ज्योती टिळक , शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. भारतकुमार अहुजा, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, फेस्टिवलचे संयोजक आणि लेखक समीर दुआ आदी उपस्थित होते.
डॉ. माशेलकर म्हणाले, उद्योगाकडे वळणाऱ्या तरूणांनी बेडुक उडी न घेता हनुमान उडी घ्यायला हवी. धीरभाई अंबानी यांंच्या सारखे उदाहरण आपल्यासमोर आहे. प्रखर महात्वाकांक्षा असेल तर हे सहज शक्य आहे. स्टार्टअप इंडियामुळे व्यवसायातून नोकऱ्या निर्माण करण्याकडे तरुणांचा ओढा आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून आपण सार्वजनिक क्षेत्रासाठीच्या खरेदीतील १० टक्के खरेदी स्टार्ट अपकडून करायची, हे बंधनकारक केले आहे. तरूणांसाठी खुप चांगली धोरणे आणण्यात आली आहे. उद्योजकता विकसनासाठी निरनिराळे कार्यक्रम, धोरण राबविले जात आहे. 
विविध क्षेत्रांमध्ये असमतोल वाढत चालला आहे. इंधन क्षेत्राचाच विचार केल्यास ठराविक देश, कंपन्यांकडे ही मक्तेदारी आहे. त्यातून असमतोल वाढत आहे. चुकीच्या इंधन वापराने पर्यावरणावर परिणाम होत आहे. नागरी भागातील चरा व्यवस्थापन, वाहतुक हे महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व गोष्टींचा समतोल साधण्यासाठी तंत्रज्ञान, धोरण, लोकसहभाग आणि आर्थिक नियोजन याचा मेळ घालवा लागेल. ही आव्हाने पेलण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, अशी अपेक्षा रवी पंडित यांनी व्यक्त केली. डॉ. नटराजन यांनी ह्यउद्योग जगतात होत असलेले नवीन बदल उद्योजकांनी स्वीकारायला हवेत,ह्ण असे सांगितले. बत्रा, टिळक व दुआ यांनीही मनोगत व्यक्त केले. कटारा यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वैदही बॅनर्जी यांनी सुत्रसंचालन केले.
--------------

Web Title: India soon '' leader '' in science and technology: Dr. Raghunath Mashelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.