भारतीय कलाकृती आभासी जगातून थेट परदेशात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:03+5:302021-08-21T04:16:03+5:30
याविषयी अधिक माहिती देताना इंगळे म्हणाले, ‘मागील काही वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असताना अनेक आर्ट फेस्टिव्हल्स व प्रदर्शनींना भेट देण्याचा ...
याविषयी अधिक माहिती देताना इंगळे म्हणाले, ‘मागील काही वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असताना अनेक आर्ट फेस्टिव्हल्स व प्रदर्शनींना भेट देण्याचा योग आला. यादरम्यान भारतातील अनेक प्रतिभावान चित्रकार व शिल्पकारांना अपेक्षित तेवढे रिप्रेझेंटेशन मिळत नसल्याची जाणीव प्रकर्षाने झाली. व्हर्च्युअल गॅलरी उभी रहावी आणि भारतीय कलाकारांना आपली कला जगभरातील रसिकांसमोर सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘आर्ट प्रेझेंट’ या व्यासपीठाची निर्मिती केली आहे.’
या व्यासपीठासाठी आजवर १६ कलाकारांनी नोंदणी केली असून त्यांच्या कला अमेरिका व युरोपमधील महत्त्वाच्या गॅलरींमध्ये पोहोचत आहेत. चित्रकार, शिल्पकारांसाठी गुणवत्तापूर्ण व्यासपीठ आर्ट प्रेझेंटद्वारे उपलब्ध होत असल्याची भावना ‘आर्ट २डे’चे संजीव पवार यांनी व्यक्त केली.
-----------
काय आहे आर्ट प्रेझेंट?
आर्ट प्रेझेंट हे एक सॉफ्टवेअर टूल असून त्याद्वारे कलाकाराला व्हर्च्युअल गॅलरी तयार करून देण्यात येते. यामध्ये कलाकार स्वत: आपली चित्रे अपलोड व डिस्प्ले करू शकतात. शिवाय त्यांना ‘आरंभ’ व ‘आर्टस्टोरीज’ या दोन व्हर्च्युअल प्रदर्शनींमध्ये देखील सहभागी होता येते. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १६ आॅगस्टपासून या दोन व्हर्च्युअल प्रदर्शनींचे आयोजन आर्ट प्रेझेंटच्या वतीने करण्यात आले आहे.