भारतीय संस्कृती ज्ञानाचे दालन : प्रकाश हिंदुजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:11 AM2018-12-23T00:11:29+5:302018-12-23T00:11:37+5:30
भारत हा देश तत्त्वज्ञानाचा जन्मदाता देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील देशांपैकी एक देश आहे. संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानातून जगाला शांतीचा संदेश आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत आहे.
कदमवाकवस्ती : भारत हा देश तत्त्वज्ञानाचा जन्मदाता देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील देशांपैकी एक देश आहे. संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानातून जगाला शांतीचा संदेश आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत आहे.
भारतीय संस्कृती, ज्ञान, तत्त्वज्ञ, संस्कृती, परंपरा आणि जागतिक तत्त्वज्ञानाचा संगम या जगातील सर्वात भव्य गोल घुमटात झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे भारतीय संस्कृती ही खºया अर्थाने ज्ञानाचे दालन म्हणून जगापुढे येईल, असे प्रतिपादन हिंदुजा ग्रुपचे संस्थापक प्रकाश हिंदुजा यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राजबाग कदमवाकवस्ती येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रकाश हिंदुजा यांच्या पत्नी कमल हिंदुजा, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, शहानी ग्रुपच्या प्रमुख माया शहानी, रुपमेक इलेक्ट्रिकल्स कंपनीचे अध्यक्ष उद्योजक नाणिक रुपानी, इंडिया अहेड न्यूज चॅनल आणि आंध्र प्रभा हैदराबादचे संचालक गौतम मुथा, के. पी. बी हिंदुजा कॉलेजच्या प्राचार्या डॉ. मीनू मडलानी, विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड आदी उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ‘‘जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटातील तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज सभागृहात उभारण्यात आलेल्या ५४ पुतळ्याच्या माध्यमातून जगाला विश्वशांतीचा संदेश देण्याचा कार्य होत राहील.
भारतीय संस्कृती ज्ञानाचे माहेरघर आहे. या देशातील अनेक संत-महंत आणि तत्त्वज्ञ यांनी जगाला विश्वशांती व मानवकल्याणाचा संदेश दिला आहे. हाच संदेश भविष्यातील नवतरुणांना अविरतपणे देण्याचे कार्य या जगातील सर्वांत मोठ्या गोल घुमटाच्या माध्यमातून होत राहील. तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय केवळ मानवी मनुष्यबळाच्या साहाय्याने उभारण्यात आलेला हा गोल घुमट एक अद्भुत आणि स्थापत्यकलेचे दर्शन घडविणारा अद्भुत नमुना आहे. व्हिजन आणि दूरदृष्टीचे दर्शन घडवत जागतिक स्तरावरील शिक्षण देण्याचे कार्य ही एमआयटी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे.’’
- प्रकाश हिंदुजा, संस्थापक हिंदुजा ग्रुप