भारतीय अधिराज्य गाजवतील
By admin | Published: March 12, 2016 12:41 AM2016-03-12T00:41:01+5:302016-03-12T00:41:01+5:30
भारतीयांत प्रचंड क्षमता असल्याने भारतीय नागरिक आगामी काळात जगावर बौद्धिक अधिराज्य गाजवतील. संगणक क्षेत्रात भारतीय संशोधकांनी आघाडी घेतली
पिंपरी : भारतीयांत प्रचंड क्षमता असल्याने भारतीय नागरिक आगामी काळात जगावर बौद्धिक अधिराज्य गाजवतील. संगणक क्षेत्रात भारतीय संशोधकांनी आघाडी घेतली आहे. सद्य:स्थितीत रोबोटमध्ये बौद्धिक क्षमता टाकण्याचे संशोधन होण्याची गरज आहे. यासाठी संशोधक, तंत्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, उद्योजकांनी एकत्रित येऊन
नागरिक केंद्रबिंदू ठेवून काम करण्याची वेळ आली आहे, असे मत शास्त्रज्ञ
डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त
केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बाबूरावजी घोलप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फंक्शनल इको फ्रेंडली स्मार्ट इमरजिंग मटेरियल्स एफ.ई.एस.ई.एम. - २०१६ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आय. आय. एस. ई. आर.चे संचालक डॉ. के. एन. गणेश, जपानचे प्रा. योशिदा हायसो, दक्षिण कोरियाचे प्रा. डॉ. सॅन वॉन रयू,
प्रा. डॉ. वाय. एच. जेऊंग, अमेरिकेचे डॉ. अशोक जोशी, आॅल इंडिया
रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे
अध्यक्ष अब्बास बुटावाला, डॉ. गोपीनाथन, डॉ. मिलिंद कुलकर्णी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे
मानद सचिव संदीप कदम,
खजिनदार मोहन देशमुख, प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, उपप्राचार्य
डॉ. एस. डी. आघाव आदी उपस्थित होते.
डॉ. के. एन. गणेश म्हणाले की, नॅनो टेक्नॉलॉजी ही काळाची गरज आहे. ऊर्जा, संवर्धन आणि संसाधन विकासातूनच स्मार्ट मटेरियल मिळवून ऊर्जेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अब्बास बुटावाला म्हणाले की, कलकत्ता येथील आॅल इंडिया रबर इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यालय पुण्यात स्थलांतरित झाल्याने पुणे आणि परिसरातील रबर उद्योगास चालना मिळेल. या अंतर्गतच बा. रा. घोलप महाविद्यालयात प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू
करण्यात आला आहे. त्यामुळे
तांत्रिक, प्रशिक्षित मनुष्यबळ
उभे राहील व भविष्यातपुणे रबर हब म्हणून ओळखले जाईल. डॉ. वैशाली नाईक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. डी. आघाव यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)