Indian Railway : १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान ३६ रेल्वे रद्द; तांत्रिक कामामुळे मेगा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:18 AM2022-11-11T11:18:55+5:302022-11-11T11:19:10+5:30

मुंबई येथील कर्णक रोडवरील ओव्हर ब्रीज पाडण्याचे काम रेल्वे करणार असल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत....

Indian Railway 36 trains canceled between 19th and 21st November; Mega block due to technical work | Indian Railway : १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान ३६ रेल्वे रद्द; तांत्रिक कामामुळे मेगा ब्लॉक

Indian Railway : १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान ३६ रेल्वे रद्द; तांत्रिक कामामुळे मेगा ब्लॉक

Next

पुणे :रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे १९ आणि २० नोव्हेंबरला तांत्रिक कामामुळे मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या ३३ रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली. मुंबई येथील कर्णक रोडवरील ओव्हर ब्रीज पाडण्याचे काम रेल्वे करणार असल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

शनिवार (१९ नोव्हेंबर) रोजी रद्द होणाऱ्या रेल्वे

पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२८), नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेस (१७६१८), हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस (१२७०२), अमरावती-मुंबई एक्स्प्रेस (१२११२), सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस (१७०५८), कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस (१७४१२), नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस (१७६११), जबलपूर-मुंबई गरीबरथ (१२१८७).

२० नोव्हेंबरला रद्द होणाऱ्या गाड्या

मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस (१७६१७), मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२७), मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेस (११००७), मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०७१), मुंबई-जबलपूर गरीबरथ (१२१८८), मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस (११००९), मुंबई - मनमाड (०२१०१), मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेस (१२१२५), मुंबई-अदिलाबाद एक्स्प्रेस (११४०१), मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (१२१२३), मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस (१२१०९), मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस (१७६१२), मुंबई-अमरावती एक्स्प्रेस (१२१११), मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस (१७४११), पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस (११०१०), पुणे - मुंबई डेक्कन क्वीन (१२१२४), पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस (१२१२६), मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस (१२११०), मनमाड-मुंबई स्पेशल (०२१०२), जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०७२), मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस (१७०५७), मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्स्प्रेस (१२७०१), पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (११००८), पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२८), नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस (१७६१८).

२१ नोव्हेंबरला रद्द होणाऱ्या गाड्या

मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस (१७६१७), मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२७), अदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस (११४०२).

रविवारी पुण्यातून सुटणाऱ्या गाड्या

मुंबई - बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस (११३०१), मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (११०२९), मुंबई-तिरूअनंतपूरम एक्स्प्रेस (१६३३१), मुंबई-गदग एक्स्प्रेस (१११३९), मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस (१२११५).

१८ आणि १९ नोव्हेंबरला दादरपर्यंतच धावणारी गाडी - पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस (२२१०६)

१९ नोव्हेंबरला पुण्यापर्यंत धावणाऱ्या गाड्या

गदग-मुबंई एक्स्प्रेस (१११४०), सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस (१२११६), तिरूअंनतपुरम-मुंबई एक्स्प्रेस (१६३३२), बंगळुरू-मुंबई उद्यान एक्स्प्रेस (११३०२).

२० नोव्हेंबरला पुण्यापर्यंत धावणारी गाडी

कोल्हापूर - मुंबई कोयना एक्स्प्रेस (११०३०)

Web Title: Indian Railway 36 trains canceled between 19th and 21st November; Mega block due to technical work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.