Indian Railway | विनातिकीट रेल्वेत बसलात, चिंता नाही! आता मिळेल तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:00 AM2022-03-11T08:00:11+5:302022-03-11T08:07:10+5:30

एचएचटी उपकरणाच्या सहाय्याने प्रवाशांसाठी रेल्वेची सुविधा..

indian railway hand held terminal ticket system online booking pune region | Indian Railway | विनातिकीट रेल्वेत बसलात, चिंता नाही! आता मिळेल तिकीट

Indian Railway | विनातिकीट रेल्वेत बसलात, चिंता नाही! आता मिळेल तिकीट

Next

प्रसाद कानडे

पुणे : 'करंट चार्ट' बनल्यानंतर देखील प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणार आहे. मात्र ही सुविधा निवडक रेल्वेला (indian railway) उपलब्ध असणार आहे. ज्या गाडीत तिकीट पर्यवेक्षकांना एचएचटी (hand held terminal ) दिले जातील, त्या गाडीत ही सुविधा मिळेल. पुणेरेल्वे विभागाने रेल्वे बोर्डकडे १०५ एचएचटीची (HHT) मागणी केली. त्यापैकी ९६ मंजूर झाले असून, ते लवकरच पुणे विभागाला प्राप्त होतील. 

रेल्वे प्रशासन एचएचटी उपकरण तिकीट पर्यवेक्षकांना देणार असल्याने याचा प्रवाशांना मोठा फायदा मिळणार आहे. प्रवाशांच्या दृष्टीने विचार केला तर आता सध्या करंट चार्ट निघाल्यानंतर आरक्षित तिकीट दिले जात नाही. अथवा सुटल्यावरदेखील प्रवाशांना आरक्षित तिकीट दिले जात नाही.

मात्र ह्या उपकरणामुळे ते शक्य होणार आहे. मात्र गाडीत सीट अथवा बर्थ उपलब्ध असणे गरजेचे आहे. उदा. पुण्याहून मुंबईला निघालेली डेक्कन क्वीन एक्सप्रेसच्या सेकंड सीटिंग प्रवाशांना त्याची क्लासमध्ये काही सीट उपलब्ध असतील, तर ह्या उपकरणांमुळे लोणावळा येथील प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढणे ह्याची माहिती मिळेल.

हे कसे काम करेल-

एचएचटी हे उपकरण रेल्वे आरक्षण केंद्रावरील प्रणालीच्या सर्व्हरशी जोडले असेल. यासाठी यात ४ जी चे सिम असेल. एखादी गाडी ओरिजनेटिंग गाडी स्टेशनहून निघाल्यावर दोन स्टेशन गेल्यावर ही एखाद्या सीटवर प्रवासी नसेल, तर तो प्रवासी प्रवासास अनुपस्थित आहे. असे समजले जाईल, गाडीतील टीटी त्याची माहिती एचएचटीवर देतील. त्याची नोंद आरक्षण प्रणालीत होईल. त्यामुळे पुढच्या स्थानकांवरच्या प्रवाशांना त्याची माहिती मिळेल. याद्वारे आरक्षित सोपे होईल.

एचएचटीचा फायदा कोणता-

  • तिकीट पर्यवेक्षकांकडे असलेले कागदी चार्ट बंद होतील. ऑनलाइन प्रवाशांची नोंद होईल.
  • प्रवाशांना वेटिंग काढावे काढावे लागणार नाही. पुढच्या स्टेशनच्या प्रवाशांना उपलब्ध सीटची माहिती मिळेल.

 

पुणे रेल्वे विभागाने यापूर्वीच एचएचटीचा प्रस्ताव दिला होता. त्यापैकी ९६ उपकरण पुण्याला मिळणार आहे. ते लवकरच मिळण्याची आशा आहे.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे

Web Title: indian railway hand held terminal ticket system online booking pune region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.