Indian Railway | नागपूर एक्स्प्रेस सेवा पूर्ववत; पुणे-सातारा गाडी १४ दिवस रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 11:45 AM2022-10-08T11:45:04+5:302022-10-08T11:45:39+5:30
पुणे-सातारा गाडी तांत्रिक कामांमुळे ०६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत रद्द
पुणे : सोलापूर विभागातील दौंड-मनमाड विभागात ब्लॉकच्या कामामुळे, रेल्वे क्र. १२१३५ पुणे-नागपूर एक्स्प्रेस ०६, ०९, ११, १३ आणि १६ ऑक्टोबर आणि रेल्वे क्र. १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस ०८, १०, १२, १५ आणि १७ ऑक्टोबर रद्द करण्यात आली होती.
नव्या निर्णयानुसार आता ही रेल्वे ६ ऑक्टोबरपासून नियमित धावणार आहे. त्याचप्रमाणे पुणे-अमरावती दरम्यान धावणाऱ्या रेल्वे क्र. २२११७/२२११८ देखील रद्द केल्या जाणार नसल्याने या रेल्वे ५ ऑक्टोबरपासून नियमित धावत आहेत.
तसेच पुणे-सातारा-पुणे दरम्यान धावणारी डेमू क्रमांक ०१५३९/०१५४० पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील वाल्हा-निरा स्थानकांदरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाशी संबंधित विविध तांत्रिक कामांमुळे ०६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत रद्द राहील, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.