भारतीय पर्यटक अधिक उत्साही

By admin | Published: March 30, 2017 02:51 AM2017-03-30T02:51:09+5:302017-03-30T02:51:09+5:30

चीनमधील पर्यटकांपेक्षा भारतीय पर्यटक अधिक उत्साही असून २०१५-१६ वर्षात अमेरिकेला तब्बल १२ लाखांवर पर्यटकांनी

Indian tourists more enthusiastic | भारतीय पर्यटक अधिक उत्साही

भारतीय पर्यटक अधिक उत्साही

Next

पुणे : चीनमधील पर्यटकांपेक्षा भारतीय पर्यटक अधिक उत्साही असून २०१५-१६ वर्षात अमेरिकेला तब्बल १२ लाखांवर पर्यटकांनी भेट दिली. शिक्षण, पर्यटन, व्यवसायासाठी अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे अमेरिकेतर्फे नेहमी स्वागतच केले जाते. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे, असे मुंबई येथील अमेरिकेचे कौन्सिलेट जनरल थॉमस वाजदा यांनी बुधवारी सांगितले.
पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत-अमेरिका या दोन्ही राष्ट्रांतर्फे २०१७ हे वर्ष ‘भारत-अमेरिका प्रवास व पर्यटन सहकार्य वर्ष’ म्हणून साजरे केले जात असून त्याबाबतची माहिती कौन्सिलेट जनरल थॉमस वाजदा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘अमेरिकेतील नागरिकांनी पर्यटनासाठी भारतात यावे आणि भारतील नागरिकांनी अमेरिकेत यावे, या उद्देशाने २०१७ हे वर्ष प्रवास व पर्यटन सहकार्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. अमेरिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा पर्यटन सहकार्य वर्ष साजरे केले जात आहे. पर्यटनासाठी अमेरिकेत यावे, यासाठी अमेरिकन कौन्सिलतर्फे व्हिसा देण्याची प्रक्रिया अधिक जलद गतीने केली जात आहे.
‘‘पर्यटनामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील सलोख्याचे संबंध गेल्या काही दशकांपासून द्ृढ होत गेले आहेत. अमेरिकेतील ऐतिहासिक शहरांबरोबरच, नॅशनल पार्क आदी स्थळांना पर्यटक भेटी देतात. पर्यटन हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा मोठा घटक आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात पर्यटकांची संख्या घटली आहे. अमेरिकेतर्फे पर्यटनासाठी अधिक प्रोत्साहन दिले जात आहे.’’
पुण्याविषयी थॉमस वाजदा म्हणाले, ‘‘पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून अमेरिकेतील काही नामांकित कंपन्या पुणे परिसरात आहेत. मी पुण्यातील कोका कोला कंपनीसह एमआयटी कॉलेज आदी ठिकाणी भेट दिली. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून स्मार्ट सिटीबाबतही माहिती मिळाली.’’ (प्रतिनिधी)

Web Title: Indian tourists more enthusiastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.