पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या भारतीय युवा सेनेच्या शहराध्यक्षाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 02:05 AM2019-01-10T02:05:36+5:302019-01-10T02:05:51+5:30

भारती विद्यापीठ पोलीस : ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Indian youth army arresting policemen | पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या भारतीय युवा सेनेच्या शहराध्यक्षाला अटक

पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या भारतीय युवा सेनेच्या शहराध्यक्षाला अटक

Next

पुणे : कात्रज चौक परिसरात वाहतूककोंडी झाल्याने कार इतरत्र पार्क करायला सांगितली म्हणून पोलिसाबरोबर हुज्जत घालणाºया भारतीय युवा सेनेच्या पुणे शहराध्यक्षाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. पप्पू ऊर्फ कमलाकर बाबूराव भंडारी (वय २९, रा. शेलार बंगला, पवार हॉस्पिटलजवळ, बालाजीनगर) असे अटक केलेल्या भारतीय युवा सेनेच्या अध्यक्षाचे नाव आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ हनुमंत अहिवळे यांनी फिर्याद दिली आहे.

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कात्रज चौकीसमोर वाहतूककोंडी झाल्याने फिर्यादी यांनी फॉर्च्युनर कारचा चालक संदीप निवंगुणे याच्या बाजूला बसलेल्या भंडारीला गाडी बाजूला घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्याने ‘माझी गाडी बाजूला लावा सांगणारे तुम्ही कोण? ही गाडी माझी आहे. मला जिथे वाटेल तिथे मी ती लावेन. मी भारतीय युवा सेनेचा पुणे शहराध्यक्ष आहे. मी गाडी काढणार नाही; तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे म्हणत फिर्यादी यांच्याबरोबर हुज्जत घातली. हा सर्व प्रकार सुरू असताना निवंगुणे हा कार घेऊन कात्रजच्या दिशेने निघून गेला असून त्याच्यावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपासासाठी भंडारी याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
 

Web Title: Indian youth army arresting policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.