भारतीयांचे तिरस्कार नाही तर विकासाच्या राजकारणाला प्राधान्य : रामराजे नाईक निंबाळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 02:48 PM2019-05-27T14:48:14+5:302019-05-27T14:58:04+5:30

वक्तृत्वोतेजक सभेच्या सहकार्याने आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजीत वसंतव्याख्यानमालेच्या उद्घटानाचे प्रथम पुष्प गुंफतांना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

indians prefer development politics rather hate politics : ramraje naik nimbalkar | भारतीयांचे तिरस्कार नाही तर विकासाच्या राजकारणाला प्राधान्य : रामराजे नाईक निंबाळकर

भारतीयांचे तिरस्कार नाही तर विकासाच्या राजकारणाला प्राधान्य : रामराजे नाईक निंबाळकर

Next

पुणे : भारतीयांनी तिरस्काराच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणालाच प्राधान्य दिले आहे. शांततामय सहजीवन हे भारतीय लोकशाहीचे गुणसुत्रे आहेत, असे म्हणटल्यास अतिशाेयाेक्ती होणार नाही, असे मत राज्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

वक्तृत्वोतेजक सभेच्या सहकार्याने आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजीत वसंतव्याख्यानमालेच्या उद्घटानाचे प्रथम पुष्प गुंफतांना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे अध्यक्ष आणि पुणे मनपाचे नगरसेवक रविंद्र माळवदकर आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे कार्याध्यक्ष भाई कात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदाचे सत्ताविसावे वर्ष आहे. 

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, भारतीय उपखंडाचा इतिहास पाहिला तर पाकिस्तान, ब्रम्हदेश, बांग्लादेश या भारता शेजारील राष्ट्रांत आजही लोकशाही व्यवस्था पाळमुळे रुजली नाहीत. त्या तुलनेत भारतात लोकशाहीची पाळेमुळे केवळ रुजली नाहीत तर लोकशाही बहरली, फुलली समृद्ध झाल्याचा अनुभव भारतीय नागरीक घेत आहे. या स्थिती पर्यंत पोहचण्यात राजकीय पक्षांपेक्षा सर्वसामान्य नागरीकांच्या योगदान अधिक आहे. लोकशाही मुल्यांवरील सर्वसामान्यांचा असलेल्या विश्वासामुळेच भारतीय लोकशाही आणि लोकशाहीतील निवडणुक प्रक्रिया मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेषकांचा संशोधनाचा विषय ठरला आहे. 

भारतीय नागरीकांच्या मनाचा ठाव त्यांना आजवर लागत नाही. निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षांमध्ये होत असलेली चिखलफेक पाहता ही भारतीय खंडाची शेवटची निवडणुक असल्याचे निष्कर्श या आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेशकांनी अनेकदा नोंदवले आहे. पंरतु ज्या शांततेच्या वातावरणात लोकशाहीत सत्तेचं परिवर्तन होते की हे विश्लेषक बुचकळ्यात पडतात. नाना विविध समुदयाचे, जाती-धर्माचे, विचारधारेचे लोक भारतात राहत असतांना देखील भारतीय लोकशाहीतील सत्तांत्तर प्रक्रिया अतिशय शांततेत होते. अनेकदा राजकीय पक्ष चुकते पंरतु सर्वसामान्य नागरीकांनी सांभाळून घेतले. स्वातंत्र्य संग्रामात ज्या नेतृत्वांनी आहुती दिली, बलिदान केले त्यांच्या त्यागावर आणि आहुतीवरच भारतीय लोकशाहीची मुल्ये टिकली असून ती मुल्ये पिढ्यांनपिढ्या परवर्तीत होत आहेत.  

Web Title: indians prefer development politics rather hate politics : ramraje naik nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.