गुरुत्वीय लहरींच्या जागतिक शोध गटात भारताचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:55+5:302021-03-23T04:10:55+5:30
खोडद : ‘इंडियन पलसार टाइमिंग आरे’(आय.पी.टी. ए.) या मुख्यतः भारतीय संशोधकाचा समूह आंतरराष्ट्रीय पल्सर टाइमिंग आरे (International Pulsar ...
खोडद : ‘इंडियन पलसार टाइमिंग आरे’(आय.पी.टी. ए.) या मुख्यतः भारतीय संशोधकाचा समूह आंतरराष्ट्रीय पल्सर टाइमिंग आरे (International Pulsar Timing Array) चा पूर्ण सदस्य बनला आहे. हा एक सुपरमसिव्ह कृष्णविवरांपासून तयार होणाऱ्या अत्यंत कमी वारंवारतेच्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्याचा प्रकल्प आहे. आय.पी.टी.ए. नियमितपणे खोडद येथील अद्ययावत जी.एम.आर.टी.चा वापर पल्सरच्या निरीक्षण व अचूक वेळेच्या मापनसाठी केला जात आहे. याच माध्यमातून महाकाय कृष्णविवरांपासून निर्मिती गुरुत्वीय लहरींच्या जागतिक शोध घेतलेल्या गटात नुकताच भारताचा समावेश झाल्याची माहिती एन.सी.आर.ए.चे संचालक प्रो. यशवंत गुप्ता व वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी दिली.
खोडद येथील जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांनी सांगितले की, ‘जी.एम.आर.टी.च्या ३००-८०० MHzची वारंवारिता आय.पी.टी.ए. वापरत असलेल्या इतर कुठल्याही दुर्बिणीमध्ये नसल्याने, अद्ययावत जी. एम. आर. टी च्या उपयोगाने आय.पी.टी.एच्या सहभागामुळे नॅनो हर्टझ ‘गुरुत्वीय लहरी’ शोधण्यासाठी अधिक सुस्पष्टता येईल. स्पेस टाईम मधल्या तरंगांना गुरुत्वीय लहरी म्हणतात. आईनस्टाईनच्या सिद्धांतानुसार, ही तरंगे दोन कृष्णविवरे एकमेकांभोवती फिरल्यावर तयार होतात. २०१६ साली लिगो डिटेक्टरने उच्च वारंवारतेच्या गुरुत्वीय लहरीचा शोध लावला. यालाच २०१७ सालाचे नोबेल पारितोषिक मिळाले.
एनसीआरएचे संचालक प्रो. यशवंत गुप्ता यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय पलसार (Pulsar) टाइमिंग आरे (आय.पी.टी.ए) जगातील मोठ्या दुर्बिणी, नियमितपणे विविध पलसारच्या घड्याळाचा कालावधी मोजण्यासाठी वापरतात. जेेव्हा ह्या लहरी शोधल्या जातील तेेव्हा आपल्याला विश्वाच्या उत्क्रांतीक मॉडेल्स, सूर्यमालेच्या घटकांच्या कक्षा आणि वस्तुमान परिष्कृत करतील आणि गुरुत्वीय लहरींच्या खगोलशास्त्राची नवीन खिडकी उघडेल.